- राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
Maharashtra SSC result 2022 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या दहावी परीक्षेच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.यात पुन्हा सावीत्रीच्या लेकींनी बाजी मारली आले. राज्याच्या एकुण निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल९६.०६ टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग पुन्हा अव्वल ठरला असून त्या पाठोपाठ कोल्हापूर विभागाने दुसरा क्रमांक मिळवला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (९५.९० टक्के) विभागाचा लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २०२०च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
विभागनिहाय टक्केवारी
पुणे विभाग - ९६.९६टक्के
नागपूर विभाग -९७ टक्के
औरंगाबाद विभाग - ९६.३३टक्के
मुंबई विभाग - ९६.९४टक्के
कोल्हापूर विभाग - ९८.५०टक्के
अमरावती विभाग -९६.८१ टक्के
नाशिक विभाग - ९५.९०टक्के
लातूर विभाग - ९७.२७टक्के
कोकण विभाग - ९९.२७टक्के