मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SSC Result 2024 live : दहावीचा निकाल जाहीर! कोकण विभाग अव्वल; एकूण निकाल ९५.८१ टक्के, मुलींनी मारली बाजी

SSC Result 2024 live : दहावीचा निकाल जाहीर! कोकण विभाग अव्वल; एकूण निकाल ९५.८१ टक्के, मुलींनी मारली बाजी

May 27, 2024 12:04 PM IST

Maharashtra Board SSC Result 2024: दहावीचा निकाल आज जाहीर झाला ९५.८१ टक्के एकूण निकाल लागला आहे. दुपारी १ वाजता हा ऑनलाइन पद्धतीने संकेत स्थळावर जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला आहे.

दहावीचा निकल आज जाहीर झाला असून ९५.८१ टक्के निकाल लागला आहे.
दहावीचा निकल आज जाहीर झाला असून ९५.८१ टक्के निकाल लागला आहे.

Maharashtra SSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण  निकाल हा ९५. ८१ टक्के लागला असून यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९९. १ टक्के लागला आहे. त्यानंतर पुणे विभागाचा निकालात दूसरा क्रमांक लागला आहे. पुणे विभागाचा निकाल हा ९६ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडलाचे गोसावी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निकाल घोषित केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Gas Cylinder Price : ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच गॅस सिलिंडर महाग होणार? का होतेय ही चर्चा

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ आहे.

यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या वर्षी १६ लाख ९ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,७७० पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३२७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,९५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ५१.१६ आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,८९४ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी २०,४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.४२ आहे.

९१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९०७८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ८४६५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.२५ आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, पुनर्परिक्षार्थी व खाजगी मिळून एकूण १६,११,८१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६,००,०२१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,१७,८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.८६ आहे.

Gautam Gambhir : आयपीएल फायनल जिंकल्यानंतर गौतम गंभीरला मिळाला सचिनसारखा सन्मान, खेळाडूंनी काय केलं? पाहा

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९९.०१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९४.७३%) आहे.

१० वीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी

सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.२१ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा २.६५ ने जास्त आहे.

एकूण १८ विषयांचा निकाल १०० टक्के टक्के लागला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५,५८,०२१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५,३१,८२२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,१४,८६६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ७९,७३२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातील २३,२८८ माध्यमिक शाळांतून १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,३८२ शाळांचा निकाल १०० % लागला आहे.

निकाल १ वाजता संकेत स्थळावर होणार जाहीर

 

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

असा पाहा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या. होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नोंदवा. स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा. थोड्या वेळात तुमचं निकाल जाहीर होईल, निकाल मिळाल्यावर पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा अथवा त्याची छापील प्रत काढून घ्या. विद्यार्थ्यांना निकाल लागल्यावर मूळ छापील प्रत ही काही दिवसांनतर त्यांच्या शाळांमध्ये दिली जाणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग