मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Best Career Options After 10th : दहावी तर पास झालात पण पुढे काय? ‘या’ पर्यायांवर करा विचार

Best Career Options After 10th : दहावी तर पास झालात पण पुढे काय? ‘या’ पर्यायांवर करा विचार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 02, 2023 05:24 PM IST

Best CareerOptionsstudents After10th :दहावीनंतर विद्यार्थ्यांकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात. विविध व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थी करू शकतात. दहावीनंतर पुढच्या शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांची माहिती घेऊ या…

Best Career Options After 10th
Best Career Options After 10th

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावीचे वर्ष खूप महत्वाचे असते. दहावीतील यशावरच पुढील शिक्षणाची व करिअरची दिशा ठरत असते. आज ( २ जून) दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून राज्याचा निकाल ९३.८० टक्के लागला आहे. दहावीत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पुढे नेमक्या कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, शिक्षणाची दिशा कशी ठेवायची असे प्रश्न पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात घोळत असतात. दहावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा, तांत्रिक शिक्षण घ्यायचं की पारंपरिक, याविषयीदेखील विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. खरं तर दहावीनंतर पुढच्या शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांची माहिती घेऊ या. 

दहावीनंतर विद्यार्थ्यांकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात. विविध व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थी करू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमदेखील खूप लोकप्रिय आहेत. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड असतात, ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकतात. विशेष म्हणजे दहावीला कमी मार्क मिळूनही आयटीआयला प्रवेश मिळत असतात.

तसं पाहिलं तर दहावी झालेले बहुतांश विद्यार्थी कॉलेज करणार असं उत्तर देतात. मात्र दहावी झाल्यावरही शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजला एडमिशन घ्यायची आहे, त्यांना देखील शिक्षण आणि नोकरी अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. असे विद्यार्थी दूरस्थ शिक्षणाचा पर्याय निवडू शकता. यात तुम्ही नोकरी करून शिक्षण घेऊ शकता. 

विद्यार्थी सहसा पारंपारिक व प्रसिद्ध असलेल्या कोर्सकडे धाव घेतात. त्याच कोर्सला विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याने सर्वांना नोकरीची संधी मिळत नाही व अनेक विद्यार्थी बेरोजगारच राहतात. याउलट काही कोर्स असे आहेत, ज्यात नोकरीच्या संधी आहोत, मात्र विद्यार्थी त्याकडे फिरकतही नाही, जसे फुटवेअर टेक्नॉलॉजी, मेटलर्जी. या विषयातून राज्यभरातून अवघी १२० मुलंच दरवर्षी बाहेर पडत असल्याने त्यांना लगेच नोकरी मिळते. या कोर्ससाठी अवघ्या ४० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळतो आणि त्यांना नोकरीचीही संधी चालून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाट न चोखाळता नवीन वाट शोधावी.

विज्ञान शाखा -

दहावी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थी बारावीपर्यंत शिकण्याचा पर्याय निवडतात. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स या तीनपैकी एका शाखेतून बारावी पूर्ण करून पुढे उच्च शिक्षण घेण्याचं विद्यार्थ्यांचं नियोजन असतं. इयत्ता बारावीसाठी अनेक विद्यार्थी सायन्स शाखेला पसंती देतात. गरज पडल्यास विद्यार्थी ग्रॅज्युएशनवेळी त्यांची स्ट्रिी बदलू शकतात. सायन्स शाखेत प्रवेश घेतल्यास करिअरचे अनेक दरवाजे खुले होतात. डॉक्टर, इंजिनीअर, आयटी, संशोधन, एव्हिएशन, मर्चंट नेव्ही, फॉरेन्सिक सायन्स, एथिकल हँकिंग हे पर्याय सायन्स शाखेतून बारावी झाल्यास उपलब्ध होतात.  बारावीतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयांवर आधारित बायो केमिस्ट्री, बायो मेडिकल इंजिनीअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, फार्मसी अशा विषयांकडे जाता येतं. त्याचबरोबर  पीसीएम  ग्रुपमधून आर्किटेक्चर,  डिफेन्स, नेव्ही,  इंजिनीअरिंग, पायलट ट्रेनिंग, टेक्नॉलॉजी विषयाकडे वळता येतं.

सायन्स शाखेतूनच एव्हिएशन, फूड सायन्स, फोरेन्सिक सायन्स, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, लाइफ सायन्स, मॅथमेटिक्स यात करिअर करता येतं.

आयटीआय अभ्यासक्रमाला वाढती पसंती –

इयत्ता दहावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना लवकर नोकरी मिळवायची आहे, असे विद्यार्थी आयटीआयचा कोर्स करू शकतात. हा कोर्स एक ते तीन वर्षं कालावधीचा असतो. यात तीन वर्षांचा एकच कोर्स असतो. अन्य कोर्स एक किंवा दोन वर्षांत पूर्ण होतात. आयटीआय संस्थेतून टर्नर, मेकॅनिक,वेल्डर, प्लंबर, इलेक्ट्रीशियन आदि कोर्स करता येतात. 

अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा –

सध्या कौशल्य विकासाला सर्वाधिक महत्त्व आहे. दहावीनंतर वेगवेगळ्या विषयांचे शॉर्टटर्म कोर्स करू शकता. यात सर्टिफिकेट आणि डिप्लोमा असे दोन कोर्स असतात. यानंतर तुम्ही एखादा छोटा जॉब करू शकता. दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा करू शकतात, त्यासाठी दहावीत गणित व विज्ञान विषय विद्यार्थ्यांनी घेतलेले असावेत. हे डिप्लोमा कोर्स ३ वर्षांचे असतात. दहावीनंतर विद्यार्थी मेकॅनिकल इंजीनियरिंग, टेक्सटाइल इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, सिविल इंजिनीअरिंग, आयसी इंजिनीअरिंग, ईसी इंजिनीअरिंग, मायनिंग इंजिनीअरिंग आदि डिप्लोमा अभ्यासक्रमांनंतर विद्यार्थ्यांना थेट इंजिनीअरिंगच्या पदवीला द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो.

नोकरी देणारे बना –

विद्यार्थ्यांनी करिअरसाठी वेगळ्या वाटा धुंडाळल्या पाहिजेत. करिअर म्हणजे केवळ नोकरी करणे नव्हे. मनात कायम जिज्ञासा ठेवून मेहनत केली तर व्यवसायातही चांगलं यश मिळू शकतं. तरुणांना स्वयंरोजगार सुरू करण्याच्या उद्देश्याने सरकारने पॉलिटेक्निक कोर्स सुरू केले आहेत. 

स्पर्धा परीक्षा व आर्ट्स शाखेतून करिअरच्या संधी -

दहावीनंतर विद्यार्थ्याच्या आयुष्यात अनेक संधी दार ठोठावत असतात. ज्याने स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी आर्ट्स शाखा हा सर्वोत्तम पर्याय आहे. यूपीएससी, एमपीएससीसारख्या परीक्षांसाठी जो अभ्यासक्रम असतो, त्यांपैकी बहुतेकसा अभ्यासक्रम आर्ट्स शाखेत शिकवला जातो. याशिवाय आर्ट्स शाखेत शिकल्यानंतर पत्रकार,  ग्राफिक डिझायनर, वकील, इव्हेंट मॅनेजर, शिक्षण, अ‍ॅनिमेटर होता येते. त्याशिवाय ब्लॉगिंग, यू-ट्यूबवर व्लॉगिंग, फ्रीलान्सिंग जॉब करून ऑनलाइन कमाईदेखील करू शकता. एखाद्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षक म्हणूनही पार्टटाइम जॉब करू शकता.

IPL_Entry_Point

विभाग