दहावी-बारावीसाठी फॉर्म नंबर १७ भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; नाव नोंदणी प्रक्रियेबाबत मोठी अपडेट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दहावी-बारावीसाठी फॉर्म नंबर १७ भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; नाव नोंदणी प्रक्रियेबाबत मोठी अपडेट

दहावी-बारावीसाठी फॉर्म नंबर १७ भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; नाव नोंदणी प्रक्रियेबाबत मोठी अपडेट

Oct 30, 2024 12:29 AM IST

SSC HSC Exam Update : फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाच्या दहावी व बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) अतिविलंब शुल्काने ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

फॉर्म नंबर १७ भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
फॉर्म नंबर १७ भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत फॉर्म नंबर १७ भरून खासगीरीत्या ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अति विलंब शुल्क भरून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्न २०२४ परीक्षेपासून संपर्क केंद्र बंद करून सर्व माध्यमिक शाळांमधून फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इ. १० वी व इ. १२वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

शिक्षण मंडळाने सर्व माध्यमिक शाळांना आवाहन केले आहे की, शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या परंतु किमान इ. ५वी उत्तीर्ण असलेल्या मुला-मुलींना माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस बसून शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी. 

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र द २वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) अतिविलंब शुल्काने ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या असून ३१ ऑक्टोबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत विद्यार्थी प्रतिदिन २० रुपये अतिविलंब शुल्क भरून परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

खाजगी विद्यार्थ्यांना इ. १० वी व इ. १२वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीनेच भरावयाचे असल्याने कोणाचाही ऑफलाईन (offline) अर्ज स्वीकारला जाणार, असे मंडळाने म्हटले आहे.  विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळाचा वापर करावा, अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी /इंग्रजीमधून उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. या संदर्भात अधिक माहितीसाठी शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता १) शाळा सोडल्याना दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र २) आधारकार्ड ३) स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोर्टा स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर