मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. परीक्षेच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; परभणीतील घटना
मृत शीतल विलास साखरे
मृत शीतल विलास साखरे

धक्कादायक.. परीक्षेच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; परभणीतील घटना

03 March 2023, 23:48 ISTShrikant Ashok Londhe

Ssc exam Student suicide : पहिला पेपर अवघड गेल्याने जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे दहावीच्या परीक्षा देणाऱ्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे.

राज्यभरात २ मार्चपासून दहावीच्या बोर्ड परीक्षांना सुरूवात झाली आहे. बुधवारी दहावीचा मराठी विषयाचा पेपर होता. परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिला पेपर अवघड गेल्याने जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे दहावीच्या परीक्षा देणाऱ्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे. मुलीने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्राथमिक पंचनामा केला आहे. शीतल विलास साखरे (वय १६ ) असे मृत मुलीचे नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार शीतल साखरे परीक्षेच्या भीतीने अवस्थ होती. पहिला पेपर देऊन आल्यापासून ती तणावात होती. ती जिल्हा परिषद शाळा भोगाव देवी येथे शिक्षण घेत होती. गुरुवारी दहावीचा मराठीचा पेपर दिल्यानंतर ती पुढच्या पेपरची तयारी करत होती. दरम्यान  दुपारच्या सुमारास घरात कोणी नसताना तिने छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने  गळफास  घेऊन आपले जीवन संपवले. यानंतर गावकऱ्यांनी याची सूचना पोलीसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ग्रामस्थांच्या मदतीने लटकलेला शीतलचा मृतदेह काढून घटनेचा पंचनामा केला.

शीतलला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. परीक्षेच्या मानसिक तणावामुळे तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.