Sambhajinagar Rape: संभाजीनगरात शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार, गुन्हा दाखल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhajinagar Rape: संभाजीनगरात शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार, गुन्हा दाखल

Sambhajinagar Rape: संभाजीनगरात शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार, गुन्हा दाखल

Oct 17, 2024 08:15 AM IST

sambhajinagar Teacher Rapes Girl Student: संभाजीनगरात नराधम शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

संभाजीनगर: शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार
संभाजीनगर: शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

Teacher Rapes 13-Year-Old Girl Student In sambhajinagar: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. यातच संभाजीनगरातून धक्कादायक माहिती समोर आली.राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १३ वर्षीय मुलीवर शिक्षकाने बलात्कार केला. याप्रकरणी पैठण शहरातील वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच आरोपी शिक्षकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीने जोर धरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जगन्नाथ गोरडे असे आरोपीचे नाव असून तो खो-खो खेळाचे प्रशिक्षण देतो. तर, पीडिताची राष्ट्रीय स्तरावर खो-खो खेळासाठी निवड झाली असून ती आरोपीकडे प्रशिक्षण घेते. आरोपीने पीडिताला मुंबईला ट्रेनिंगसाठी जायचे आहे, असे सांगून तिला रेल्वे स्थानकावर बोलवून घेतले. त्यानंतर तिला जवळच्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तो पीडिता शिकत असलेल्या शाळेत गेला आणि तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले. परंतु, पीडिताने नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने संपूर्ण गावात तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. आरोपीच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून पीडिताने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर पीडिताच्या आईने वेदांतनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

ठाणे: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तिघांना अटक, चौथा फरार

ठाणे शहरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून आणखी एकाचा शोध सुरू आहे. ६ ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास माजिवडा ते साकेत दरम्यान पाण्याच्या पाईपलाईनच्या बाजूने रस्त्यावरून जात असताना चार जणांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या चुलत बहिणीला अडवले. आरोपींनी दोघांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे मोबाइल हिसकावून घेतले, तर एकाने तिच्यावर बलात्कार केला.

या गुन्ह्याबद्दल बोलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही आरोपींनी दोघांना दिला आहे. मंगळवारी अल्पवयीन मुलीने कापूरबावडी पोलिस ठाणे गाठल्यानंतर पोलिसांनी योगेश मल्लिंगे (२१), परशुराम लकडे (२८) आणि ओंकार पाटकर (२२) या तिघांना अटक केली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा चौथा आरोपी अविनाश धोत्रे फरार असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.मात्र, अल्पवयीन मुलीने उशिरा तक्रार का दाखल केली, याचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही. बलात्कार, दरोडा आणि धमकावणे आणि पोक्सो कायद्यान्वये भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर