ठाण्यात कारची दुचाकीला धडक, मदत करण्याऐवजी कारचालक झाला पसार, वेळेत उपचार न मिळाल्यानं तरुणाचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाण्यात कारची दुचाकीला धडक, मदत करण्याऐवजी कारचालक झाला पसार, वेळेत उपचार न मिळाल्यानं तरुणाचा मृत्यू

ठाण्यात कारची दुचाकीला धडक, मदत करण्याऐवजी कारचालक झाला पसार, वेळेत उपचार न मिळाल्यानं तरुणाचा मृत्यू

Oct 22, 2024 08:14 AM IST

Thane Hit-And-Run: ठाण्यात हीट अँड रनचे प्रकरण घडले. एका भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

ठाण्यात भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
ठाण्यात भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Thane accident News: ठाण्यात भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. नौपाडा पोलिसांनी कारच्या अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

दर्शन शशिधर हेगडे (रा. ज्ञानेश्वर नगर, ठाणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभर उपवास केल्यानंतर हेगडे सोमवारी मध्यरात्री १.५० च्या सुमारास अन्न खरेदीसाठी बाहेर पडला. जेवण घेण्यासाठी तो स्कूटरवरून ठाणे रेल्वे स्थानकावर गेला. मात्र, मुंबई-नाशिक महामार्गावरून घरी परतत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या मर्सिडीजने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर कारचालकाने दर्शनला रुग्णालयात नेण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. रस्ताने जाणाऱ्या एका प्रवाशाने दर्शनला रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले. त्यानंतर त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हेगडे तासभर घरी न परतल्याने त्याचा भाऊ शशांक हेगडे यांनी त्याला अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर नौपाडा पोलिसांनी त्याला फोन करून अपघाताची माहिती दिली. याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी

दर्शन हेगडे हा बीएस्सी चे शिक्षण घेत होता आणि त्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे होते, असे त्याच्या कुटुंबातील लोकांनी सांगितले. त्याचे मित्र चंद्रकांत मायमे म्हणाला की, ‘रुग्णालयात त्याला पाहिल्यावर आम्ही पूर्णपणे अस्वस्थ झालो होतो. मी त्याला लहानपणापासून ओळखतो आणि तो बाईक किती छान चालवतो, हे मी पाहिले. अपघातादरम्यान कार भरधाव वेगाने जात होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आरोपीला तात्काळ अटक करावी’, अशी आमची मागणी आहे.

कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

अभिजीत सुरेशबाबू नायर असे चालकाचे नाव आहे. नायर यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (२) (बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यू), २८१ (बेदरकारपणे वाहन चालविणे), १२५ (ब) (गंभीर इजा करणे) आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर