Pune To Ayodhya Train : राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी रामभक्त ही अयोध्या दर्शनासाठी जाणार आहेत. पुण्याहून देखील मोठ्या प्रमाणात भाविक जाणार आहे. दरम्यान, प्राण प्रतिष्ठापणा झाल्यावर भाविकांची रिघ आयोध्यात वाढणार आहे. पुण्यातील नागरिकांना अयोध्या येथे जाता यावे या साठी पुणे रेल्वे विभागाने तब्बल १५ गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने ३० जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी दर दोन दिवसांनी एक ट्रेन पुण्याहून अयोध्येसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरातून नागरिकांना अयोध्या येथे दर्शनासाठी जाता यावे यासाठी भारतीय रेल्वेने प्रभू रामभक्तांसाठी २०० विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३० जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी १५ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. दरम्यान सोडण्यात येणाऱ्या गाड्या या स्लीपर कोच असणार आहे. या साठी रेल्वेसेवेसाठी तीन रॅकचा वापर करण्यात येणार आहे. एका गाडीतून दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकणार आहे. या गाड्यांचे बुकिंग देखील लवकरच सुरू केले जाणार आहे. या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला तर आणखी फेऱ्या वाढवण्याच्या विचारात पुणे रेल्वे अधिकारी आहेत. पुण्यातून नेमक्या कोणत्या गाड्या धावणार याची लवकरच माहिती जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, जम्मू-काश्मीर येथून अयोध्येला जाण्यासाठी आस्था स्पेशल रेल्वे गाड्या देखील सोडण्यात येणार आहेत.
मुंबई – अयोध्या – मुंबई, नागपूर – अयोध्या – नागपूर, पुणे – अयोध्या – पुणे, वर्धा – अयोध्या – वर्धा, जालना – अयोध्या – जालना, गोवा – १ आस्था स्पेशल
दिल्ली
नवी दिल्ली स्टेशन – अयोध्या – नवी दिल्ली स्टेशन, आनंद विहार - अयोध्या - आनंद वियारम, निजामुद्दीन - अयोध्या - निजामुद्दीन, जुने दिल्ली रेल्वे स्थानक – अयोध्या धाम - जुनी दिल्ली रेल्वे स्थानक
गुजरात
उधना – अयोध्या – उधना, इंदूर - अयोध्या - इंदूर, महेसाणा - सालारपूर - महेसाणा, वापी - अयोध्या - वापी वडोदरा - अयोध्या – वडोदरा, पालनपूर - सालारपूर - पालनपूर, वलसाड - अयोध्या - वलसाड, साबरमती - सालारपूर - साबरमती
मध्य प्रदेश
इंदूर - अयोध्या - इंदूर, बीना - अयोध्या - बीना, भोपाळ – अयोध्या – भोपाळ, जबलपूर - अयोध्या – जबलपूर
तेलंगणा
सिकंदराबाद - अयोध्या - सिकंदराबाद, काजीपेट जंक्शन - अयोध्या - काजीपेट जंक्शन
तामिळनाडू
चेन्नई – अयोध्या – चेन्नई, कोईम्बतूर - अयोध्या – कोईम्बतूर, मदुराई – अयोध्या – मदुराई, सालेम - अयोध्या - सालेम
जम्मू-काश्मीर
जम्मू-अयोध्या-जम्मू, कटरा - अयोध्या - कटरा