Special Train : दिवाळीनंतर तुफान गर्दी… नागपूरहून मुंबई, पुणे प्रवासासाठी ‘या’ स्पेशल ट्रेन पकडा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Special Train : दिवाळीनंतर तुफान गर्दी… नागपूरहून मुंबई, पुणे प्रवासासाठी ‘या’ स्पेशल ट्रेन पकडा

Special Train : दिवाळीनंतर तुफान गर्दी… नागपूरहून मुंबई, पुणे प्रवासासाठी ‘या’ स्पेशल ट्रेन पकडा

Updated Nov 23, 2023 11:36 AM IST

Special trains - नागपूर ते मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांच्या एकूण ६० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Special trains from Nagpur to Mumbai
Special trains from Nagpur to Mumbai

दिवाळीच्या सुट्ट्या संपत आल्याने मुंबई, पुण्याहून आपआपल्या गावी उत्सव साजरा करण्यासाठी आलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि पुणे येथे परतण्यास सुरूवात झाली आहे. नागरिकांची एकदम गर्दी वाढल्याने सर्व ट्रेन गाड्या फुल्ल झाल्या आहेत. परिणामी ऐन वेळी प्रवास करण्यासाठी रेल्वे गाडीचे तिकीट उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. अशातच खासगी ट्रॅव्हल बसने प्रवास करण्याकडे लोकांचा कल दिसतो आहे. परंतु ट्रॅव्हल गाड्याही फुल्ल आहेत. अशावेळी प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांच्या एकूण ६० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वे गाड्यांद्वारे गावी अडकलेल्या प्रवाशांना आता मुंबई आणि पुण्याला जाणे सोपे होणार आहे. या गाड्या खालीलप्रमाणेः

नागपूर - मुंबई स्पेशल ट्रेन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते नागपूर (ट्रेन क्र.०२१३९) ही आठवड्यातून दोन दिवस धावणारी विशेष रेल्वे गाडी आता २८ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

तर नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई (ट्रेन क्रमांक ०२१४०) ही आठवड्यातून दोन दिवस धावणारी विशेष रेल्वेगाडी ३० डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या गाडीला चाळीसगाव आणि जळगाव येथे अतिरिक्त थांबे देण्यात आले आहे.

नागपूर - पुणे स्पेशल ट्रेन

नागपूर ते पुणे (ट्रेन क्र. ०२१४४) ही आठवड्यातून एक दिवस धावणारी विशेष ट्रेन आता २८ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

पुणे ते नागपूर (ट्रेन क्रमांक ०२१४३) ही आठवड्यातून एक दिवस धावणारी विशेष ट्रेन २९ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

चंद्रपूर मुंबई स्पेशल ट्रेन

लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते बल्हारशाह (ट्रेन क्रमांक ०११२७) ही साप्ताहिक विशेष ट्रेन आता २६ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

तर, बलहारशाह ते लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई (ट्रेन क्रमांक ०११२८) ही साप्ताहिक विशेष ट्रेन आता २७ डिसेंबर २०२३ पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

अमरावती - पुणे स्पेशल ट्रेन

पुणे ते अमरावती (ट्रेन क्र. ०१४३९) ही आठवड्यातून दोन वेळा धावणारी विशेष ट्रेन ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

तर, अमरावती ते पुणे (गाडी क्रमांक ०१४४०) ही आठवड्यातून दोन वेळा धावणारी स्पेशल ट्रेन आता १ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

स्पेशल ट्रेनचे आरक्षण कसे कराल

विशेष ट्रेन क्रमांक ०२१३९/०२१४० च्या सर्व विस्तारित सेवांचे विशेष शुल्कासह बुकिंग त्वरित उघडले जाणार आहे. विशेष ट्रेन क्रमांक ०२१४४/०२१४३, ०११२७/०११२८ आणि ०१४३९/०१४४० विशेष शुल्कासह २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्व संगणकीकृत केंद्रावर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडतील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर