Special Trains for konkan : कोकणात शिमगोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. होळीचा सण (holi festival) जवळ आला असून या निमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते. या पार्श्वभूमीवर मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून या मुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. कोकण रेल्वेने अहमदाबाद - मडगाव, एलटीटी - थिविम, पनवेल - सावंतवाडी, उधना - मंगळुरू, सुरत - करमळी होळी विशेष गाड्या या मार्गावर धावणार आहेत.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद - मडगाव होळी विशेष गाड्या १९ मार्च पासून तर परतीसाठी मडगाव - अहमदाबाद होळी विशेष रेल्वेगाडी २० आणि २७ मार्च रोजी सुटणार आहे. ही रेल्वेगाडी वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमाळी येथे थांबणार आहे.
तर एलटीटी - थिविम विशेष - रेल्वेगाडी ही १४, २१ आणि २८ मार्च रोजी रात्री तर, थिविम-एलटीटी विशेष रेल्वेगाडी १५, २२, २९ मार्च रोजी दुपारी सोडली जाणार आहे. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबणार आहे. तर सावंतवाडी रोड पनवेल विशेष (साप्ताहिक)गाडी ही १२, १९ आणि २६ मार्च रोजी सावंतवाडी रोडवरून रात्री सुटणार आहे.
तर पनवेल - सावंतवाडी रोड - विशेष (साप्ताहिक) पनवेल येथून १३, २० आणि २७ मार्च रोजी सकाळी सोडण्यात येणार आहे. या गाडीला कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. तर उधना - मंगळुरू होळी विशेष रेल्वेगाडी ही २० आणि २४ मार्च रोजी तर, मंगळुरू - उधना होळी विशेष रेल्वेगाडी २१ आणि २५ मार्च रोजी रात्री सोडण्यात येणार आहे. सुरत - करमाळी होळी विशेष रेल्वे गाडी २१ आणि २८ मार्च रोजी सायंकाळी तर करमाळी सुरत होळी विशेष रेल्वेगाडी २२ आणि २९ मार्च रोजी सकाळी सोडण्याचे नियोजन कोकण रेल्वेने केले आहे.
संबंधित बातम्या