संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या; सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या; सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या; सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक

Jan 04, 2025 10:04 AM IST

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या आणखी दोन मारेकऱ्यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या; सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या; सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला आहे. या घटनेनंतर आता या हत्याकांडातील फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुलेस व सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या दोघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाचा वेग पोलिसांनी वाढवला आहे. पुण्यात या प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्य आरोपी वाल्मिक कराडने सीआयडीसमोर सरेंडर केलं होतं. तर आणखी तीन मुख्य आरोपी हे फरार होते. पोलिस तिघांचा गेल्या काही दिवसांपासून शोध घेत होते. अखेर त्यांना अटक करण्यात आले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना अटक केली आहे. हे दोघे व संतोष देशमुख यांचं लोकेशन देणाऱ्या आणखी एकाला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. सिद्धार्थ सोनवणे असे तिसऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याने हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांच्या लोकेशन आरोपींना सांगितलं होतं. यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी सिद्धार्थ सोनवणेला मुंबईतून अटक केली आहे.

संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यानंतर हे सर्व आरोपी फरार होते. देशमुख यांच्या हत्येचे परिमाण संपूर्ण राज्यात उमटले होते. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी मार्फत केला जात आहे. दरम्यान, बीड पोलिसांच्या विशेष पथकानं सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना अटक केली असून त्यांना सीआयडीला सुपूर्द करण्यात येणार आहे.

वाल्मीक करार पुण्यात सीआयडी पुढे शरण 

या घटनेतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा देखील  फरार होता. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे व त्याला अटक केली जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. दरम्यान, वाल्मीक कराडला अटक करण्यासाठी पोलिस त्याचा शोध घेत होते. या साठी त्याची संपत्ती देखील गोठवण्यात आली होती. अखेर वाल्मीक कराड हा पुण्यात सीआयडीच्या मुख्यालयात पोलिसांना शरण आला. 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर