Mumbai local Train : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आज पासून गणेशोत्सवासाठी रात्रकालीन लोकलच्या २२ जादा फेऱ्या-special night local train on central harbour western line from today on occasion of ganeshotsav 2024 in mumbai ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai local Train : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आज पासून गणेशोत्सवासाठी रात्रकालीन लोकलच्या २२ जादा फेऱ्या

Mumbai local Train : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आज पासून गणेशोत्सवासाठी रात्रकालीन लोकलच्या २२ जादा फेऱ्या

Sep 14, 2024 09:25 AM IST

Mumbai local Train update : मुंबईत गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये व त्यांना या उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी आज पासून लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आज पासून गणेशोत्सवासाठी रात्रकालीन लोकलच्या २२ जादा फेऱ्या
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आज पासून गणेशोत्सवासाठी रात्रकालीन लोकलच्या २२ जादा फेऱ्या (HT)

Mumbai local Train update : मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, या गणेश भक्तांची गैरसोय दूर होऊन त्यांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने मध्य रेल्वेने रात्रीच्या लोकलफेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. ही लोकल सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, कल्याण दरम्यान सुरू राहणार आहे. तब्बल २२ जादा लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहे. या बाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनई रेल्वेकडे विनंती केली होती. ही विनंती रेल्वेने मान्य केली आहे. आज रात्रीपासून ते मंगळवारी रात्रीपर्यंत या जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

मुंबईत गणेश मंडळांनी केलेले देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहे. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळाना नागरिक भेट देऊन गणरायाचे दर्शन घेत आहेत. त्यामुळे त्यांना घरी जातांना गैरसोय होत होती. लोकल सेवा रात्री १२ पर्यंत असल्याने त्यापुढे घरी जातांना वाहने नसल्याने लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार उत्सव काळातील नागरिकांची गर्दी पाहता सुट्टीच्या तीन दिवसात एकूण २२ रात्रकालीन विशेष लोकलफेऱ्या चालवण्यात येणार आहे.

या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सीएसएमटी-ठाणे-सीएसएमटी आणि सीएसएमटी-पनवेल-सीएसएमटी मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. आज शनिवारी मध्यरात्रीनंतर पुढील तीन दिवस या फेऱ्या सुरू ठेवल्या जाणार आहेत. तर पश्चिम रेल्वेने देखील विसर्जनाच्या दिवशी मध्यरात्रीनंतर चर्चगेट ते विरार ते चर्चगेट दरम्यान ८ फेऱ्या चालवणार आहे.

Whats_app_banner