weather forecast : भारतीय हवामान विभागाने (आईएमडी) बुधवारी सांगितले की, नैऋत्य मान्सून (Monsoon Update) वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यपणे दक्षिण-पश्चिम मान्सून सामान्यपणे सात दिवस पुढे-मागे होत १ जून रोजी केरळमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर पुढे सरकत १५ जुलैपर्यंत संपूर्ण देशात सक्रीय होत असतो.
यावेळी नैऋत्य मान्सून वेळेआधीच अंदमान-निकोबारमध्ये दाखल होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १९ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्या १० दिवसात केरळमध्ये दाखल होणार आहे. सामान्यपणे २२ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होत असतो मात्र यंदा तीन दिवस आधीच अंदमानात दाखल होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एल निनोचा प्रभाव कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे, यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी स्थिती अनुकूल आहे. यंदा मान्सून वेळेआधीच भारतात येऊ शकतो. तसेच ला नीना सोबतच, हिंद महासागरातील हवेच्या दाबाची परिस्थितीही चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल होत आहे.
नैऋत्य मान्सून १९ मे पर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर १ जून पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर धडकेल. बंगालच्या उपसागरातून भारताच्या मुख्य भूमीकडे मान्सून सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे, त्यामुळे १९ मेपर्यंत मान्सून भारतीय हद्दीत दाखल होईल, असा अंदाज आहे.
केरळनंतर महाराष्ट्रातही वेळआधीच मान्सून दाखल होणार आहे. महाराष्ट्रात मान्सून ११ जून रोजी दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर दिल्लीत मान्सूनचे आगमन होण्यास ३० जून पासून सुरूवात होऊ शकते. त्याआधी १० जूनला चेन्नईत मान्सून पोहोचेल.
आयएमडीने म्हटले की, मागील १९ वर्षात केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाचा अंदाज २०१५ चा अपवाद वगळता खरे ठरले आहेत. याआधी हवामान विभागाने मंगळवारी एका रिपोर्टमध्ये म्हटले होते की, नैऋत्य मान्सून १९ मे च्या आसपास दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि निकोबार बेट समुहाकडे सरकरण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्तर-पश्चिम भारतात १६ मे पासून पूर्व भारतात १८ मे पासून उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने बुधवारी व्यक्त केला.
संबंधित बातम्या