HIngoli Murder : हिंगोली हादरले! पैसे देत नसल्याच्या रागातून सख्ख्या भावासह आई- वडिलांची हत्या; अपघाताचा रचला बनाव
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HIngoli Murder : हिंगोली हादरले! पैसे देत नसल्याच्या रागातून सख्ख्या भावासह आई- वडिलांची हत्या; अपघाताचा रचला बनाव

HIngoli Murder : हिंगोली हादरले! पैसे देत नसल्याच्या रागातून सख्ख्या भावासह आई- वडिलांची हत्या; अपघाताचा रचला बनाव

Jan 15, 2024 11:41 AM IST

HIngoli Murder news: हिंगोलीत एका मुलाने घरचे पैसे देत नसल्याच्या कारणावरून आई, वडील भाऊ यांची हत्या करत त्यांच्या हत्येचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

hingoli crime
hingoli crime

HIngoli Murder news: हिंगोली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई, वडील पैसे देत नसल्याच्या कारणाने एका मुलाने क्राइम सिरियल बघून आपल्या जन्मदात्या पालकांसह भावाची हत्या केल्याचे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी मुलाने त्यांच्या अपघाताचा बनाव देखील रचला. डिग्रस वाणी येथे ११ जानेवारीला घडली.

Hingoli Accident : अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी कोसळली नाल्यात! आई-वडिलांसह मुलाचा करुण अंत

वडिल कुंडलिक जाधव, आई कलावती जाधव आणि मुलगा आकाश जाधव असे खून करण्यात आलेल्या आई, वडील आणि भावाचे नाव आहे. तर महेंद्र जाधव असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलीसांनी आरोपी मुलाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या गुरुवारी (दि ११) रोजी दिग्रस वाणी गावाच्या शिवारात दुचाकी रस्त्याच्याकडेला असलेल्या वळणात पडलेली आढळून आली. तर त्या ठिकाणी असलेल्या नाल्यात वडिल कुंडलिक जाधव, आई कलावती जाधव आणि मुलगा आकाश जाधव यांचे मृतदेह आढळून आले होते. ही घटना नागरिकांना सकाळच्या वेळेला समजली. त्यांनी पोलिसांना पाचारण करून या अपघाताची माहिती दिली होती. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे हिंगोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान, मृत कुंडलिक जाधव यांचा दुसरा मुलगा महेंद्र जाधव याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.

sharad mohol case : शरद मोहोळ हत्या प्रकरणी पनवेलमध्ये कारवाई! गुंड विठ्ठल शेलार, रामदास मारणेला अटक; ११ जण ताब्यात

त्याची चौकशी केली असता, महेंद्रचे आई वडील आणि भाऊ त्याला पैसे देत नव्हते. तसेच नातेवाईकांमध्ये पैसे मागितल्याच्या कारणावरून बदनामी करत असल्याचा राग देखील महेंद्रच्या मनात होता. यामुळे त्याने, क्राईम सिरीयल बघून खुनाचा कट रचला. महेंद्रने आधी भाऊ आकाश जाधव याची हत्या केली. त्यानंतर त्यानंतर आई कलावती आणि नंतर वडील कुंडलिक जाधव यांचा खून केला. त्यानंतर गावाजवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला त्यांना टाकून देऊन आपघाचा बनाव त्याने रचला. मात्र, पोलिसांनी त्याचे बिंग फोडून त्याला अटक केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे हिंगोलीत खळबळ उडाली आहे. एक मुलगा आपल्या आई वडील आणि भावाला असे ठार मारू शकतो यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये. जाधव कुटुंब परिसरात परिचित होते. मात्र, त्यांच्या सोबत जे अघटित घडलं, यामुले नागरीक हळहळ व्यक्त करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर