लेकीबाळी, मेहुणे, काका, पुतण्या, जावई... महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलाय फॅमिली ड्रामा, ही यादीच पाहा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लेकीबाळी, मेहुणे, काका, पुतण्या, जावई... महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलाय फॅमिली ड्रामा, ही यादीच पाहा

लेकीबाळी, मेहुणे, काका, पुतण्या, जावई... महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलाय फॅमिली ड्रामा, ही यादीच पाहा

Updated Oct 29, 2024 04:56 PM IST

Maharashtra Politics : राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून सर्व प्रमुख पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. घरायणेशाहिला या निवडणुकीत प्राधान्य दिले असल्याचं स्पष्ट झालं आहे.

लेकीबाळी, मेहुणे, काका, पुतण्या, जावई... महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलाय फॅमिली ड्रामा, ही यादीच पाहा
लेकीबाळी, मेहुणे, काका, पुतण्या, जावई... महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलाय फॅमिली ड्रामा, ही यादीच पाहा

Maharashtra Politics : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. या रणसंग्रामात  उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत अनेक पक्षांनी घराणेशाहीला विरोध केला आहे. मात्र,  प्रस्थापितांनी आपल्याच कुटुंबीयांना उमेदवारी देण्याचा आग्रह केल्याने या निवडणुकीत फॅमिली ड्रामा रंगल्याच स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना तर शरद पवार यांनी युगेंद्र पवार, रोहित पवार यांच्यासह भाजपचे अशोक चव्हाण यांनी मुलगी श्रीजया चव्हाण, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील या सारख्या अनेकांनी आपल्याच घरातील उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. मोठ्या प्रमाणात आज अनेक उमेदवार शक्ति प्रदर्शन करत अर्ज भरणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. असे असले तरी अनेकांनी दोन ते तीन उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. जाहीर केलेल्या यादीत पुन्हा घराणेशाहीला प्राधान्य दिले असल्याचं सिद्ध झालं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपने देखील उमेदवारी जाहीर करतांना घराणेशाहिलाच प्राध्यान्य दिले असे जाहीर केलेल्या यादी वरून स्पष्ट झालं आहे. भाजपने नव्या चेहऱ्यांना फारशी संधी दिली नाही. काही ठिकाणी आयात उमेदवारांना संधी दिली आहे. तर काही उमेदवार हे थेट माजी आमदार खासदार यांच्याशी संबंधित आहेत.

राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर म्हणाले की, राजकारणात अशा प्रकारची घराणे शाही मान्य असते. राजकीय कुटुंबे थेट कुटुंबाशी संबंधित असल्याने आपल्याच घरातील उमेदवार हा उभा राहावा अशी त्यांची इच्छा असते.

भाजपमध्येही घराणेशाही 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे किंवा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांच्यासारख्या राजकीय कौटुंबिक वारसा असलेल्यांचा या भाजपच्या यादीत समावेश आहे. ही यादी मोठी आहे. कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायवाड  यांना भाजपने उमेदवारी देत पुढे आणले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना संधी दिली आहे. माजी मंत्री अनिल शिरोळे यांच्या मुलगा सिद्धार्थ शिरोळे यांना शिवाजी नगर येथून पुन्हा उमेदवारी दिली आहे. माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला पोटनिवडणुकीत संधी दिली होती. तर आता शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. शंकर जगताप यांना देखील राजकीय पार्श्वभूमी आहे. भाजपचे माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचा मुलगा हरिभाऊ जावळे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. तर आशीष शेलार यांचा भाऊ विनोद शेलार यांना भाजपने उमेवारी दिली आहे.

शरद पवार राष्ट्रवादी पक्षाने या राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्यांना दिली संधी

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांना संधी दिली आहे. बारामती येथून शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना संधी दिली आहे. युगेंद्र पवार हे थेट अजित पवार यांना लढत देणार आहे. माजी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांची मुलगी नंदिनी कुपेकर यांना संधी दिली आहे. विद्यमान खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयूरा काळे यांना आर्वी मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून या राजकीय पक्षांशी संबंधितांना दिली संधी

शिवसेना एकनाथ शिंदे गटाने खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना विधानसभेसाठी संधी दिली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना संधी दिली आहे. माजी खासदार आनंद अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार अनिल बाबर यांचा मुलगा अनिल बाबर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार सांडीपान भूमरे यांचा मुलगा विकास भूमरे यांना देखील उमेदवारी संधी दिली आहे.

कॉँग्रेस कडून वर्षा गायकवाड यांच्या बहीण ज्योति गायकवाड यांना कॉँग्रेसने उमेदवारी दिली आहे. माजी आमदार सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना देखील कॉँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुलगा आदित्य ठाकरे, आणि पुंडलीक म्हात्रे यांची मुलगी नंदिनी कुपेकर यांना संधी दिली आहे. तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या