सोमालिया किनारपट्टीजवळ एका मोहिमेत पकडण्यात आलेले ३५ समुद्री चाच्यांना घेऊन युद्धनौका आयएनएस कोलकाता शनिवारी सकाळी मुंबईत दाखल झाली. त्यानंतर पकडण्यात आलेल्या समुद्री चाच्यांना मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात आले. नौदलाने ही कारवाई ‘ऑपरेशन संकल्प'च्या माध्यमातून केली. या मोहिमेंतर्गत भारतीय नौदलाची जहाजे अरबी समुद्र आणि अदन खाडीत तैनात करण्यात आली आहेत. यामुळे येथून जाणाऱ्या युद्धनौका व मालवाहू नौकांची सुरक्षा केली जाऊ शकले. याच ऑपरेशनमध्ये भारतीय नौदलाने समुद्री डाकूंच्या समुहाला जेरबंद केले आहे.
नौदलाने सांगितले की, आयएनएस कोलकाता जेरबंद करण्यात आलेले ३५ समुद्री चाच्यांना घेऊन २३ मार्च रोजी मुंबईत परतले. भारतीय कायदा व समुद्री चोरी विरोधी अधिनियम २०२२ नुसार या प्रकरणात पुढील कारवाई केली जाईल. समुद्री चाच्यांना स्थानिक पोलिसांकडे सोपवले आहे.
१५ मार्च रोजी ४० तासाहून अधिक काळ चाललेल्या ऑपरेशनमध्ये INS कोलकाताने यूकेएमटीओ (यूनाइटेड किंगडम मेरीटाइम) मधून भारतीय नौदलाच्या सूचना संलयन केंद्र-हिंद महासागर क्षेत्रातील इनपुटच्या आधारावर अरबी समुद्रात समुद्री चाच्यांचे जहाज रोखून धरले होते. या जहाजाचा वापर समुद्री लुटपाटसाठी हल्ले व व्यापाऱ्यांच्या अपहरणासाठी केला जात होता. त्यानंतर १५ मार्चच्या सकाळपासून INS कोलकाताने समुद्री चाच्यांच्या जहाजावर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती.
समुद्री चाच्यांनी आईएनएस कोलकाता पाहून आपला मार्ग बदलून सोमालिया किनारपट्टीकडे जात होते. नौदलाने सांगितले की, जहाजाच्या वरच्या डेकवर शस्त्रधारी समुद्र चाचे दिसून आले. त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र त्यांनी नौसैनिकांवर गोळीबार सुरू केला. दरम्यान INS कोलकाताने आत्मसुरक्षेसाठी कारवाई करत जहाज ध्वस्त केले व समुद्री चाच्यांना जेरबंद केले. या ऑपरेशनमध्ये INS कोलकाता सोबत INS सुभद्राही सामील होते.
भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर जहाजावरील सर्व समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केले. त्यानंतर ३५ समुद्री चाचे व १७ चालक दलाच्या सदस्यांना ताब्यात घेतले.