Solapur News: लोक आपल्या घरात कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे अनेक प्राणी पाळतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील शेटफळ गावात लोक चक्क विषारी साप पाळतात. या गावात साप पाळण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. विशेष गोष्ट म्हणजे, या गावातील कोणत्याच ग्रामस्थाला सापाने कधीच दंश केला नसल्याचे बोलले जात आहे.
शेटफळ गावाला नागोबाचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात अनेक जुनी घरे आहेत. घराचे बांधकाम करतानाच ग्रामस्थ सापाला राहण्यासाठी जागा ठेवतात. आश्चर्याची बाब म्हणजे या गावातील मुलेही कोब्रासारख्या विषारी सापाशी खेळत मोठी होतात. ग्रामस्थ सापाला घाबरत नसून सापही त्यांना दंश करत नाही. गावातील लोकांचे म्हणणे आहे की, साप हे हिंदू धर्मातील देवता शिवाचे अवतार आहेत. गावातील लोकांचा असा विश्वास आहे की, साप हे केवळ प्राणी नसून दैवी प्राणी आहेत, त्यांची पूजा केली पाहिजे. या गावात सापांचे मंदिरही आहे.
मिळालेल्या शेटफळ गावची लोकसंख्या तीन हजारांच्या जवळपास घरात आहे. शेटफळ गावात ९ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. सर्व समाजातील लोक या गावात वास्तव्यास आहेत. गावाच्या लोकसंख्येपेक्षा सापांची संख्या अधिक असल्याची समजत आहे. हे गाव पर्यटन स्थळ बनवण्यासाठी सरकारकडून काही पावले उचलली जात आहेत.
नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे भारतात प्रामुख्याने मानवी वस्तीत आढळणारे चार प्रमुख विषारी साप आहेत. परंतु, घोणस सापाच्या दंशामुळे भारतात सर्वाधिक लोक मरतात. अँटीडोट हे सर्पदंशावर निव्वळ एकमात्र उपाय आहे. भारतात आढळणाऱ्या विषारी सापांमध्ये नाग, नागराज, मण्यार, फुरसे, घोणस, समुद्री साप, पोवळा, पट्टेरी पोवळा, चापडा यांचा समावेश आहे. तर, विनविषारी सापांमध्ये अजगर, धामण, तस्कर, गवत्या, वाळा सर्प, पाणसाप, हरणटोळ, दिवड, नानेटी, मांडोळ, खापखवल्या आणि कवड्या यांचा समावेश आहे.
- जखम स्वच्छ पाण्याने धुवा.
- पायी चालणे आणि बोलणे टाळावे.
- सापाने हाताला दंश केला असेल तर दंडाला दोरीने बांधून आवळून घ्यावे.
- सापाने पायाला दंश केला असेल तर, मांडीला दोरीने बांधून आवळून घ्यावे.
- बोट किंवा पेन टाकूनच दोरी बांधावी.
- दर १५ मिनिटांनी दोरी पुन्हा सोडून बांधून घ्यावी.
- चहा, कॉफी किंवा मद्यपान करू नये.
- सर्पदंश झालेल्या जागेवर कापू नये, यामुळे जास्तीचा रक्तस्राव होऊन सबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.
- महत्त्वाचे म्हणजे, डॉक्टरांना कळवावे आणि रुग्णालय गाठूपर्यंत त्यांच्या संपर्कात राहावे.