Markadwadi Voting : सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी ग्रामस्थ मतपत्रिकेवर मतदान घेण्यावर ठाम आहे. गावकऱ्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आज मंगळवारी (दि ३) बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं ठरवलं आहे. मात्र, या मतदानाला प्रशासनाचा विरोध आहे. हे मतदान होऊ नये यासाठी प्रशासनाने गावात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र ग्रामस्थ मतदान घेण्यावर ठाम असून गोळ्या घातल्या तरी हे मतदान होणारचं अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ऐवढेच नाही तर दूध का दूध पाणी का पाणी आजच होऊ द्या असे देखील ग्रामस्थांनी म्हटलं आहे. दरम्यान, पोलिस बंदोबस्तामुळे गावाला छावणीचे रूप आले आहे.
मारकडवाडी मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर विजयी झालेले आहेत. मात्र, मारकडवाडी गावामध्ये महायुतीच्या राम सातपुतेना सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे. या ठिकाणी सातपुते यांना एवढी मते मिळू शकत नाही असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ बॅलेट पेपरवर फेरमतदान घेणार आहे. हे फेरमतदान आज मंगळवारी घेतले जाणार आहे. मात्र, मतदानाला प्रशासनाने विरोध केला असून गावात हे मतदान होऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त देखील लागू करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस गावात जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी या मतदानाची तयारी केली आहे. बॅलेट पेपर देखील छापण्यात आले आहे. हे बॅलेट पेपर गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन दाखवण्यात येत असून त्यांनी आधी ज्यांना मतदान केलं. त्यांना पुन्हा मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एवढेच नाही तर तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच पोलिसांनी कितीही दबाव आणला तरी, हे मतदान होणारच अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर विजयी झालेले आहेत. मात्र, मारकडवाडी गावामध्ये महायुतीच्या राम सातपुतेना सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे जानकर यांचे मताधिक्य कमी होण्यामागे ईव्हीएम दोषी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मारकडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने ८० टक्के मतदान झाले असताना ईव्हीएममधून मात्र, वेगळीच आकडेवारी पुढे आल्याने ग्रामस्थांनी ईव्हीएमवर मोठा आक्षेप घेतला आहे. या गावात राम सातपुते यांना ८४३ तर जानकर यांना १००३ मते मिळाली. मात्र, या आकडेवरिवर गावकऱ्यांना शंका आहे. त्यामुळे त्यांनी गावात आज मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आज गावात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.