मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Solapur: पेट्रोल मिळणार नसल्याची अफवा, घाईघाईने पेट्रोल पंपाकडे जाताना दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

Solapur: पेट्रोल मिळणार नसल्याची अफवा, घाईघाईने पेट्रोल पंपाकडे जाताना दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 03, 2024 02:38 PM IST

Solapur Road Accident: सोलापुरात पेट्रोल भरण्यासाठी घाईघाईने निघालेल्या दुचाकीस्वारचा अपघाती मृत्यू झाला.

Accident
Accident

Solapur Bike Accident: सोमवारी संध्याकाळपासूनच पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर एक-एक किलोमीटर लांबत लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल मिळणार नसल्याची अफवा पसरल्याने पंपावर वाहनांची तोबा गर्दी झाली. मात्र, अशा अफवांना बळी पडलेल्या सोलापुरातील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. शहरात पुढील काही दिवस पेट्रोल मिळणार नसल्याने संबंधित तरुण घाईघाईने दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर निघाला. मात्र, पेट्रोल पंपावर पोहचण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला.

शिवशंकर नागनाथ मरगल (वय, ४१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवशंकर हा सोलापुरातील सग्गम नगर येथे वास्तव्यास होता. दरम्यान, सोमवारी रात्री पासून सोलापुरात पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरली होती. त्यानंतर सोमवारी रात्री ११. ३० वाजताच्या सुमारात तो पेट्रोल भरण्यासाठी निघाला. पेट्रोल भरण्याच्या घाई गडबडीत पंपाकडे जाताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि तो दुचाकीसह मुळेगाव तांडा रोडवरील नाल्यात पडला. या अपघातात शिवशंकरच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला बेशुद्धावस्थेत जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शिवशंकर याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एक मुलगी १२ वी दुसरा मुलगा इयत्ता ९ वीत शिकत असल्याचे त्याचे नातलग भास्कर म्हाडा यांनी सांगितले. शिवशंकरच्या अपघाती मृत्युने मरगल कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे.मंगळवारी रात्री उशिरा शिवशंकरवर अंतिम संस्कार करण्यात आले.

असामध्ये रस्ता अपघातात १२ जणांचा मृत्यू

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत १२ प्रवासांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये ५ महिला आणि एका अल्पवयीन मुलांसह एकूण १२ जणांचा समावेश आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्ग ३७ वर डेरगाव येथे आज पहाटे ५ वाजता घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

WhatsApp channel

विभाग