मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Solapur Fire: सोलापुरात रबर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी

Solapur Fire: सोलापुरात रबर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 15, 2023 10:01 AM IST

Solapur Rubber Factory Fire: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील रबर कंपनीला आग लागल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

Solapur Fire
Solapur Fire (HT)

Solapur Fire News: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील रबर कारखान्याला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसीतील रबर कारखान्याला आग लागल्यानंतर आजूबाजूच्या कापड कारखान्यांनाही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी न झाल्याचे वृत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील रबर कारखान्याला भीषण आग लागली. त्यानंतर सोलापूर पालिका, एमआयडीसी, एनटीपीसी, अक्कलकोट शहर, बार्शी अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या आगीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही आग किती भीषण आहे, या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. या आगीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या आगीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.

चुलीतून ठिगणी उडाल्यानं झोपडीला भीषण आग

सोलापूरात सोमवारी (१३ फेब्रुवारी) चुलीतून ठिगणी उडाल्यानं झोपडीला भीषण आगीत एका वृद्ध दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या गाडेगाव शिवारात ही घटना घडली. भीमराव काशीराम पवार आणि कमल भीमराव पवार असे मृत दाम्पत्याचं नाव आहे. घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग