Solapur Barshi Crime News : सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदली झाल्यामुळे एका पोलिस कॉन्स्टेबलने टोकाचं पाऊल उचललं आहे. या पोलिसांना गळफास घेऊन त्याचं जिवन संपवलं आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील वैराग येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश ज्योतीराम पाडुळे असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्या आमहत्येचे ठोस कारण समोर आले नसले तरी त्यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली होती, यातून नैराश्य आल्याने त्यांनी हे पाऊल उचळल्याचं बोललं जात आहे.
महेश पाडुळे हे वैराग येथे राहत असून बुधवारी रात्री ते घरी आले. यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश पाडुळे हे मुळचे माढा तालुक्यातील अंजनगावचे असून ते सोलापूर ग्रामीण मुख्यालयात काम करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली करण्यात आली होती. बदली झाल्याने ते कुटुंबीयांसोबत वैराग येथे राहायला आले होते. त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने सोलापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जात त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा करण्यात आल आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे याचा शोध पोलिस घेत आहे.
साताऱ्यातील शिरवळ एमआयडीसी येथे एका तरुणाचा पूर्व वैमनस्यातून तलवारीने वर करून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री घडली. अमर कोंढाळकर असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी तेजस निगडे या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या