Pandharpur News : पंढरपुरातील यल्लमा देवीच्या मंदिरात चोरी, चांदीची मूर्ती, पादुकांसह १० लाखांचे दागिने लांबवले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pandharpur News : पंढरपुरातील यल्लमा देवीच्या मंदिरात चोरी, चांदीची मूर्ती, पादुकांसह १० लाखांचे दागिने लांबवले

Pandharpur News : पंढरपुरातील यल्लमा देवीच्या मंदिरात चोरी, चांदीची मूर्ती, पादुकांसह १० लाखांचे दागिने लांबवले

Published Dec 08, 2023 07:17 PM IST

Pandharpur news : पंढरपुरातील कासेगाव येथील यल्लमा मंदिरातील देवीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हल्ला मारला. देवीच्या १० लाखांचे दागिने चोरीला गेल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

Pandharpur Kasegaon :  पंढरपुरातील कासेगाव येथील यल्लमा देवीच्या मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातील तृतीयपंथी आणि जोगतीण यांचे आराध्य देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे. चोरट्यांनी देवीच्या चांदीच्या मूर्ती आणि पादुकांसह जवळपास १० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. घटनास्थळी ग्रामस्थ व भाविकांनी मोठी गर्दी केली असून या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. चोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी देवीची चांदीची मूर्ती, चांदीच्या पादुका, चांदीची प्रभावळ असे जवळपास १० लाखांचे दागिने लांबवले आहेत. चोरट्यांनी पुजाऱ्याच्या घराला बाहेरून कडी घातली व मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास चोरीची घटना घडली. पहाटे पाच वाजता पुजारी मंदिरात आल्यावर ही घटना उघडकीस आली. 

मंदिराचे सीसीटीव्ही बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. अतिशय जागृत म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात झालेल्या चोरीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत. लवकरच चोरट्यांना अटक करू असे पोलिसांनी सांगितले आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर