मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आई की कैदाशीण.. सहा वर्षाच्या चिमुकल्याचे कुऱ्हाडीने केले दोन तुकडे, सोलापुरातील घटना

आई की कैदाशीण.. सहा वर्षाच्या चिमुकल्याचे कुऱ्हाडीने केले दोन तुकडे, सोलापुरातील घटना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 26, 2024 11:18 PM IST

Mother Killed Son : महिलेने कुऱ्हाडीने वार करत आपल्या मुलाच्या शरीराचे दोन तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

सोलापूर जिल्ह्यात आई व मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका निष्ठूर आईने  पोटच्या सहा वर्षांच्या कोवळ्या मुलावर कुऱ्हाडीने वार केले. महिलेने कुऱ्हाडीने वार करत आपल्या मुलाच्या शरीराचे दोन तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाची हत्या केल्यानंतर महिलेने स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील कव्हे गावात घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रणव गणेश चोपडे असे हत्या झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. कौशल्या उर्फ कोमल असे आरोपी आईचे नाव आहे. मुलाचे दोन तुकडे केल्यानंतर कौशल्याने तणनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत मुलाचे आजोबा नारायण चोपडे (वय ५७) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार कौशल्या हिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपल्या मुलाचे दोन तुकडे करण्यापर्यंत महिलेने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समोर आले नाही..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नारायण व त्यांच्या पत्नी पार्वती मौजे पाच पिंपळे (ता. परांडा, जि. धाराशिव) येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी गेले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांची सून कौशल्या हिने फोन करून सांगितले की, तिने मुलगा प्रणवचा खून केला आहे. तेव्हा धक्का बसलेल्या नारायण चोपडे यांनी कौशल्याचा भाऊ आणि आपला मुलगा गणेश (मयत मुलाचे वडील) यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली आणि त्या दोघांना तात्काळ घरी जाण्यास सांगितले.  

दरम्यान, गणेश हा घरी धावून आला असता घरातील भयानक दृश्य पाहून तो पार कोसळला. कौशल्याने बाळाच्या शरीरावर कु-हाडीने वार करून त्याचे दोन दोन तुकडे केले होते. हे भीषण दृष्य पाहून तो हादरून गेला.

IPL_Entry_Point

विभाग