मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Solapur Crime : चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून झोपेतच पत्नीची हत्या, रात्रीच लावली मृतदेहाची विल्हेवाट

Solapur Crime : चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून झोपेतच पत्नीची हत्या, रात्रीच लावली मृतदेहाची विल्हेवाट

Jun 25, 2024 04:21 PM IST

Solapur Crime News : चारित्र्या्च्या संशयातून पतीने साखर झोपेत असलेल्या पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील तेलगाव भीमा येथेघडली

चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून झोपेतच पत्नीची हत्या. (इनसेटमध्ये मृत महिला)
चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून झोपेतच पत्नीची हत्या. (इनसेटमध्ये मृत महिला)

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या केल्याचाधक्कादायकप्रकार सोलापूरमधूनसमोर आली आहे.साखर झोपेत असलेल्या पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील तेलगाव भीमा येथेघडली.या घटनेनेपरिसरातखळबळ उडालीअसूनया प्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे.

भाग्यश्री बसवराज कोळी असे हत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तरबसवराज आडव्याप्पा कोळी असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणीपतीसहशिवानंद आडव्यापा कोळी आणि गजानन आडव्यापा कोळी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणीचंद्रकांत कोळी यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली होती.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार बसवराज कोळी आणि भाग्यश्री यांचा २०१४ मध्ये विवाह झाला होता. दोन वर्षापासून हे दाम्पत्य निम्बर्गीतील शेतातील घरात रहात होता. दाम्पत्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. ही गोष्ट बसवराज याने भाग्यश्रीच्या आई-वडिलांना सांगितली होती. भाग्यश्रीचे माहेर लोणी आहे. बसवराजने सासरवाडीत गेल्यावर पत्नी ऐकत नाही. नेहमी भांडत असल्याची तक्रार दिली. त्यानंतर बसवराजने मेव्हणा चंद्रकांत कोळीला तेलगावला बोलावून घेतले.

बसवराजने मेव्हण्याकडे तक्रार करताना म्हटले की, तुझ्या बहिणीचे चारित्र्य चांगले नसल्याचे सांगितले. तिने निंबर्गी येथील एकासोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. त्यांनी दोघांनाही समजावले होते. मात्र बसवराजचा राग गेला नव्हता. त्याने याच रागातून पत्नीची हत्या केली. २३ जून रोजी रविवारी रात्री झोपल्यानंतर बसवराजने तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.बसवराजच्या भावाने भाग्यश्रीची हत्या केलेली जागा दाखवली. घटनास्थळी बांगड्याचे तुकडे पडलेले दिसले.भाग्यश्रीच्या डोक्यात घालून तिची हत्या केलेल्या ठिकाणी फरशी फुटून खड्ड पडला होता.या घटनेनंतर आरोपी पतीने व त्याच्याभावांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृत भाग्यश्रीचे रक्ताने माखलेले कपडे,अंथरुणजाळून टाकले. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

 

बहिणीला पळवून नेणाऱ्या मुलाच्या वडिलांची हत्या -

बहिणीला पळून नेल्याच्या रागातून एकाने मुलाच्या वडीलाची हत्या केली. कटाळू कचरू लहाटे (वय ५५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नव आहे. तर इस्माईल शेख (वय २५) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. खून झालेल्या व्यक्तीचा मुलगा आणि आरोपी व त्याची बहीण मित्र आहे. आरोपीच्या बहिणीला त्याने पळून नेल्याने खुनाची ही घटना सोमवारी घडली आहे. ही घटना पुण्यातील येरवडा येथे घडली.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर