पत्नीला खांद्यावर घेऊन नाचल्याने चढला भावजयीचा पारा, चाकू भोसकून केली दिराची हत्या; सोलापुरातील घटना-solapur crime news man killed by his brothers wife for dancing with his own wife at festive ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पत्नीला खांद्यावर घेऊन नाचल्याने चढला भावजयीचा पारा, चाकू भोसकून केली दिराची हत्या; सोलापुरातील घटना

पत्नीला खांद्यावर घेऊन नाचल्याने चढला भावजयीचा पारा, चाकू भोसकून केली दिराची हत्या; सोलापुरातील घटना

Aug 06, 2024 10:31 PM IST

Solapur crime : पत्नीला खांद्यावर घेऊन नाचल्याचा राग मनात धरून वहिनीने दीराच्या पोटात चाकू भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यात घडली.

चाकू भोसकून केली दिराची हत्या
चाकू भोसकून केली दिराची हत्या

पत्नीसोबत नाचल्याचा राग मनात धरून भावजयीने दीराची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दीर त्याच्या पत्नीला खांद्यावर घेऊन गावातील लक्ष्मीदेवीच्या उत्सवात वाद्यांच्या तालावर नाचत होता. याचा राग मनात धरून भावजयीने दिराच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी या गावात घडली. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

धनराज हिरा काळे (वय ३०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची भावजय आशा ऐजिनाथ काळे (वय ३३) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत धनराजची पत्नी संगीता (वय २७) हिने फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागोबाची वाडी गावात काळे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून रहात आहेत. नागोबाची वाडी गावात दरवर्षीप्रमाणे लक्ष्मीदेवीचा उत्सव साजरा केला जात होता. या उत्सवात शेकडो भाविक सहभागी झाले होते. सायंकाळच्या सुमारास पारंपरिक वाद्यांच्या तालावर देवीच्या उत्सवात भाविक बेधुंद होऊन नाचत होते. या उत्साही वातावरण धनराज काळे याने आपली पत्नी संगीता हिला खांद्यावर उचलून घेतले आणि तो नाचू लागला. हा प्रकार त्याची भावजय आशा काळे हिला आवडला नाही. तिने देवकार्यातून काढता पाय घेत घर गाठले. देवीचा उत्सव संपल्यानंतर काही वेळानंतर धनराजही घरी पोहोचला. या वेळी भावजय आशाने धनराजशी भांडण काढले आणि रागाच्या भरात तिने हातातील चाकूने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत तो घरातून बाहेर पळत आला. त्याने भावजय आशा हिने पोटात चाकूने भोसकल्याचे सांगितले. त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले असता मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

मुंबईतील गिरगावात भररस्त्यात पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला -

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उरण येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर झालेल्या हल्ल्यावेळी आजुबाजूच्या नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने तिला जीव गमवावा लागला होता. अशीच घटना मुंबईतील गिरगाव येथे घडली आहे. कौटुंबिक वादातून भररस्त्यात पतीने पत्नीवर ब्लेडने हल्ला केल्याची घटना गिरगाव परिसरात घडली आहे. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीने त्याच ब्लेडने स्वतःवरही वार केले. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव बचावला आहे. या घटनेत पतीही जखमी झाला आहे.

 

विभाग