डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीनेच (doctor wife ended her life) गळफास घेत स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. उच्च शिक्षिक महिलेच्या आत्महत्येने परिसरात खळबळ माजली आहे. MRI मशीन विकत घेण्यासाठी डॉक्टरपतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने हे पाऊल उचलले. सूरज रूपनर असे डॉक्टर पतीचे नाव आहे तर डॉक्टर ऋचा रूपनर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
या घटनेमुळे सांगोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांगोला पोलिसांनी डॉक्टर पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पोलीस फरार डॉक्टराचा शोध घेत आहेत.
ऋचा रूपनरयांनी पतीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेच्या तीन दिवसांनंतर संशयित आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांच्यासोबत डॉक्टर ऋचा यांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन लहान मुलं देखील आहेत. सूरज सांगोला येथील प्रसिध्द फॅबटेक उद्योग समुहाचे प्रमुख आणि शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांचा मुलगा आहे.लग्नानंतर डॉक्टर सुरज हा पत्नी ऋचाला वारंवार मानसिक आणि शारिरीक त्रास देवून पैशाची मागणी करत होता. सुरजला एमआरआय मशीन विकत घेण्याचा प्रयत्न करत होता. यासाठी माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर आत्महत्या कर म्हणत पत्नी ऋचा यांना त्रास देत होता.
नेहमीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर ऋचा रुपनर यांनी ६ जून रोजी सांगोला येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋचा यांचा भाऊ ऋषिकेश पाटील यांच्या तक्रारीनुसार डॉक्टर सुरज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांचा शोध सुरु आहे.
डॉक्टर सुरज आणि ऋचा हे सांगोला येथील फेबटेक इंजिनिअरिंग कॉलेज वसाहतीमध्ये राहत होते. डॉक्टर सुरज आणि डॉक्टर ऋचा दोघेही एमडी रेडिओलॉजिस्ट होते. दोघेही पंढरपूर येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते.
संबंधित बातम्या