सोशल मीडिया रिल्सच्या वादातून एक तरुणाची हत्या केल्याची घटना कोल्हापूर शहरातील (Kolhapur Crime)संभाजीनगर परिसरात घडली आहे. संभाजीनगरातील सुधाकर जोशी नगरात टोळी युद्धातून आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास तलवार व एडक्याचे सपासप वार करून तरुणाची हत्या करण्यात आली. सुजल बाबासो कांबळे (वय२०,वारे वसाहत, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. त्याचा ८ ते १० जणांच्या टोळक्याने खून केला. याबाबतजुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजीनगर परिसरातीलसुधाकर जोशी नगरातील एका चौकातगुरुवारी दुपारीसुजल कांबळे मित्रांसहगप्पा मारतबसला होता. यावेळीतीन दुचाकीवरून आलेल्या८ ते१० जणांनी त्यांच्यावर तलवारींनीहल्ला केला.हल्लेखोरांनी पाठलाग करून सुजलच्या पाठीत, पोटावर आणि हातावर गंभीर वार केले. तो रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर पळून गेले. सुजलला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या मित्रांनी त्यालासीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सीपीआर परिसरातसंभाजीनगर, वारे वसाहत येथील त्याचे मित्र व नातेवाईकांनी गर्दी केली होती.
सुजल व त्याच्या मित्रांचा सोशल मीडियावरील पोस्टवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता. या वादातूनच सुजलचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके,जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा सीपीआरमध्ये दाखल झाला.
अंबाझरी तलावात बुडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. वाढदिवशीच मुलाचा मृत्यू झाल्याने कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरी वाढदिवस साजरा केल्यानंतर मित्रांना पार्टी देण्यासाठी अंबाझरी तलावावर गलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे तीन वाजता पंपहाऊसवर घडली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. पुलकित राज शहदादपुरी (वय १६) असे मृत मुलाचे नाव आहे. तो अकरावीच्या वर्गात शिकत होता. जरीपटक्यातील एका महाविद्यालयात तो शिकत होता.
वाढदिवसाच्या रात्री तो व त्याचा एक मित्र तालावाकाठी पब्जी खेळत होते. दरम्यान,पब्जी खेळण्यात मग्न असलेल्या त्या युवकाचा पाय घसरला आणि पाण्यात पडला. काही मिनिटांतच त्याचा बुडून मृत्यू झाला.
संबंधित बातम्या