Thane Accident : ठाण्यात हीट अँड रनच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशाच एका घटनेत एका समाजसेविकेचा मृत्यू झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे असे त्यांचे नाव असून गुरुवारी त्या सकाळी फिरायला गेल्या असतांना त्यांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्या गंभीर जखणी झाला. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पा आगाशे (वय ७३) या गुरुवारी सकाळी फिरायला गेल्या होत्या. यावेळी एका भरधाव वेगातील वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यानंतर चालक त्यांना मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, आगाशे यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
आगाशे यांचा ज्या परिसरात अपघात झाला, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. त्या आधारे पोलिस वाहनाचा शोध घेत आहेत.
आगाशे यांनी अणुऊर्जा विभागात २८ वर्षे काम केले आणि २००८ साठी त्यांना डीएईचा सर्वोत्तम कर्मचारी पुरस्कार देखील मिळाला. १९८१ पासून त्या त्यांचे पती श्रीपाद आगाशे यांच्यासोबत नेत्रदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करत होत्या. अवयवदान, त्वचादान आणि देहदानाला प्रोत्साहन देण्यातही त्यांचं मोठ योगदान झाले. अपघातानंतर त्यांचे पार्थिव आणण्यात आलेल्या ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधील सहियारा आय बँकेतील डॉक्टरांच्या मदतीने त्यांचे डोळे यशस्वीरित्या दान करण्यात आले.
निवृत्तीनंतर, त्यांनी अंध विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांचं जिवन समर्पित केलं. गेल्या दशकात, त्या प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याच्या मोहिमेत सक्रिय होत्या. तसेच अनाथ मुलांची काळजी घेण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्या धान्य बँकेच्या सक्रिय सदस्य होत्या. ही बँक गरीब लोकांना अन्नधान्य पुरवण्याचं काम करते.
पुष्पा अंगशेअन्नई समृद्धी पोरे दिग्दर्शित 'प्रकाश वाटा' या चित्रपटात साधना आमटेची भूमिका केली होती, ज्यामध्ये नाना पाटेकर मुख्य भूमिकेत होते. पुष्पा आगाशे यांच्या पश्चात पती, पत्रकार आशिष आगाशेसह दोन मुले, दोन सुना आणि एक नातू असा परिवार आहे.
संबंधित बातम्या