मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संत वाल्मिकी नगरीत विसावला माऊलींचा पालखी सोहळा; उद्या होणार मानाचे निरा स्नान
Sant Dnyaneswar maharaj pakhi sohala
Sant Dnyaneswar maharaj pakhi sohala
27 June 2022, 19:31 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 19:31 IST
  • जेजुरी येथील विसाव्यानंतर पालखी सोहळा दौंडज येथे विश्रामासाठी थांबला होता. येथील विसावा घेतल्या नंतर हा पालखी सोहळा वाल्हे गावाकडे मार्गस्थ झाला. जवळपास दुपारी २ च्या सुमारास पालखी सोहळा वाल्हेत पोहचला.

Ashadhi wari Palkhi sohala 2022  जेजुरी आणि दौंडज येथील मुक्काम आटोपून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महरांचा पालखी सोहळा संत वाल्मिकीनगरी असलेल्या वाल्हे येथे विसावली. पालखी गावात येताच या सोहळ्यावर फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पावासानेही हजेरी लावत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना निरास्नान घातले जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जेजुरी येथील विसाव्यानंतर पालखी सोहळा दौंडज येथे विश्रामासाठी थांबला होता. येथील विसावा घेतल्या नंतर हा पालखी सोहळा वाल्हे गावाकडे मार्गस्थ झाला. जवळपास दुपारी २ च्या सुमारास पालखी सोहळा वाल्हेत पोहचला. यावेळी वाल्लेकर ग्रामस्थांनी माऊलींचा नगारा, घोडे व माऊलींच्या पालखीच्या रथाचे फुलांची उधळण करीत स्वागत केले. यावेळी हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. पालखी सोहळा मुक्कामी असलेल्या सुकलवाडी रेल्वे गेटच्या मुक्कामी पालखीतळावर दुपारी अडीच वाजता पोहोचला.

हजारोंच्या उपस्थितीत समाज आरती

प्रत्येक ठिकाणी पालखी सोहळाच्या मुक्कामच्या दररोज सायंकाळी समाज आरती घेतली जाते. या वर्षी पालखी दुपारी पोहचली. दरवर्षी येथे होणा-या समाज आरतीला महत्व असते. यावर्षीही हजारोंच्या उपस्थितीत तसेच पावसाच्या हलक्या सरींमध्ये ही समाज आरती करण्यात आली. महाभारतात श्रीकृष्णाने अजुर्नास विश्वरूप दर्शन दिले होते. तसेच पालखी सोहळ्यात माऊलींचे विश्वरूप दर्शन समाज आरतीच्या वेळेस पहावयास मिळाले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विकास ढगेपाटील, बाळासाहेब चोपदार,राजाभाऊ चोपदार,यांच्यासह सोहळ्यातील मानकरी वारकरी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. पालखी सोहळा उद्या सकाळी सहा वाजता निरेच्या दिशेने जाणार असुन निरा नदी स्नान करुन सातार जिल्ह्यतील लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.

संत तुकोबारायांच्या सोहळा रोटी घाट पार करत उंडवीत मुक्कामी

संत तुकोबांचा सोहळा यवत, वरवंड, पाटस येथील मुक्काम आटोपून रोटी घाटामार्गे उंडवडी येथे मुक्कामी पोहचला आहे. या ठिकाणी ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. येथील मुक्काम आटोपून सोहळा शारदा विद्यालयाच्या प्रांगणात मुक्कामी राहणार आहे.