अरे बापरे..! मुंबईतील न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच फायलींवर सरपटताना दिसला भलामोठा साप, सर्वांचीच पळापळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अरे बापरे..! मुंबईतील न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच फायलींवर सरपटताना दिसला भलामोठा साप, सर्वांचीच पळापळ

अरे बापरे..! मुंबईतील न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच फायलींवर सरपटताना दिसला भलामोठा साप, सर्वांचीच पळापळ

Dec 24, 2024 11:43 PM IST

Snake In Courtroom : न्यायालयात साप आढळल्यानंतर साप पकडणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. जुन्या फायलींनी भरलेले कोर्टरूम आणि अनेक छिद्रे असलेल्या भिंती आणि फरशींमधून सापाचा शोध घेतला गेला.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

Snake In Courtroom : मुंबईतील एका कोर्टरूममध्ये मंगळवारी अचानक फाइल्सच्या ढिगाऱ्यावर साप दिसला.  यामुळे वकिलांसह सर्वांचीच पळापळ झाली. या घटनेमुळे सुमारे तासभर कोर्टाचे कामकाज विस्कळीत झाले. मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयातील कक्ष क्रमांक २७ दुपारपर्यंत सुरळीत सुरू असताना फायलींचे ढीग खोदताना एका पोलिस कर्मचाऱ्याला दोन फूट लांबीचा साप दिसला. कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या वकिलांनी सांगितले की, या घटनेमुळे तेथे उपस्थित लोकांमध्ये घबराट पसरली आणि न्यायाधीशांना सुनावणी काही काळासाठी पुढे ढकलावी लागली.

वकिलांनी सांगितले की, त्यानंतर साप पकडणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. जुन्या फायलींनी भरलेले कोर्टरूम आणि अनेक छिद्रे असलेल्या भिंती आणि फरशींमधून सापाचा शोध त्यांनी घेतला. मात्र खूप शोध घेऊनही साप सापडला नसल्याचे वकिलांनी सांगितले. कदाचित तो खोलीतील एका छिद्रात शिरला असावा. तासाभरानंतर न्यायालयाने कामकाज पुन्हा सुरू केले. 

याआधीही कोर्ट परिसरात दिसले होते साप -

अधिवक्ता विश्वरूप दुबे म्हणाले की, झाडे आणि वनस्पतींनी वेढलेल्या या कोर्टरूममध्ये साप दिसण्याची ही पहिलीच घटना नाही. ते म्हणाले की, एक दिवसापूर्वी कोर्टरूमच्या खिडकीवर एक साप दिसला होता. दोन महिन्यांपूर्वी न्यायाधीशांच्या दालनात एक साप दिसला होता.

या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने पीडितांचे प्राण वाचविण्यासाठी आरोग्य केंद्रे, रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अँटीव्हेनम आणि सर्पदंशाचे उपचार करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या  याचिकेवर केंद्र आणि इतरांकडून उत्तर मागितले होते. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी अँटीव्हेनमचा वापर केला जातो. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आणि केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस बजावून उत्तर मागितले. नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर द्यावे, असे खंडपीठाने म्हटले आहे. '

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर