ST Bus Accident : भरधाव एसटी बस मर्दडी घाटात कोसळली; सहा प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ST Bus Accident : भरधाव एसटी बस मर्दडी घाटात कोसळली; सहा प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

ST Bus Accident : भरधाव एसटी बस मर्दडी घाटात कोसळली; सहा प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

Oct 06, 2023 03:13 PM IST

Buldhana ST Bus Accident : मलकापुरहून संभाजीनगरच्या दिशेने येत असलेल्या एसटी बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.

ST Bus Accident Sambhaji Nagar
ST Bus Accident Sambhaji Nagar (HT)

ST Bus Accident Sambhaji Nagar : मलकापुरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. भरधाव एसटी बस मर्दडी घाटात कोसळली असून त्यामध्ये किमान सहा ते सात प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींपैकी दोन लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. अपघातग्रस्त एसटी बसमध्ये एकूण १३ प्रवासी होते. सुदैवाने या घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. दैव बलवत्तर म्हणून एसटी बसमधील सर्व प्रवासी बचावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आगाराची एसटी बस छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाली होती. एसटी बसचा वेग जास्त असल्याने दुधा देवी घाट वळणावर अचानक चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. परिणामी भरधाव एसटी बस मर्दडी देवी घाटातील खोल दरीत कोसळली. रस्त्याचा कठडा तोडून बस खोल दरीत कोसळल्याची घटना समजताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने बसमधील सर्व १३ प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात आलं आहे. परंतु सहा प्रवासी किरकोळ जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मलकापूर ते संभाजीनगर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. अपघातात जखमी झालेल्या तीन प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर अन्य दोघांना पुढील उपचारासाठी बुलढाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा आणि संभाजीनगर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर सातत्याने अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळं आता नागरिकांनी सावधानतेने वाहनं चालवण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या