Maharashtra Politics :विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता आहे. अनेकांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता सतावत आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांचे ६ खासदार एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे, असे झाल्यास उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसेल.
राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तपमण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गट उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फोडण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सध्या चर्चेत असून याच ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक नेते शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. संसदेच्या अधिवेशनात शिवसेना गटाचे सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उद्धव ठाकरे गटाचे नऊपैकी सहा खासदार ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदे गटात प्रवेश करतील. संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी ही मोहीम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑपरेशन टायगर अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. परंतु पक्षांतरबंदी कायद्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत होते. खासदारांना वाचवण्यासाठी नऊपैकी सहा खासदारांना पक्षांतर करावे लागणार आहे. एकूण ६ खासदारांची समजूत काढायलाही वेळ लागल्याचं बोललं जात आहे. या खासदारांना त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता आहे. त्यांना निधी मिळण्यात अडचणी येत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आपले करियर स्थिर करण्यासाठी ते शिंदे यांच्या सेनेत प्रवेश करणार आहेत.
ठाकरे गटातील काही आमदारही शिंदे गटात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. लवकरच ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपही शिंदे यांना पूर्ण पाठिंबा देत आहे.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुढील पाच वर्षे भक्कम स्थितीत आहे. यामुळे अनेक खासदारांना आपल्या भवितव्याची चिंता सतावत आहे. प्रामुख्याने निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने शिंदे गटात सामील होणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निवडणूक लढवली आणि जनतेने त्यांना स्वीकारले. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीतही त्यांना मान्यता मिळाली. शिवसेनेने मोठा विजय मिळवला. आता पक्ष आणि निवडणूक चिन्हाशिवाय काहीच शिल्लक राहिलेले नाही.
संबंधित बातम्या