Navi Mumbai Murder: विद्यार्थ्यांमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या; नवी मुंबईतील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai Murder: विद्यार्थ्यांमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या; नवी मुंबईतील घटना

Navi Mumbai Murder: विद्यार्थ्यांमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या; नवी मुंबईतील घटना

Mar 15, 2024 07:28 AM IST

Navi Mubai Class 12 Student Murder: नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात इयत्ता दहावीचा पेपर सुटल्यानंतर दोन गटात झालेल्या वादामुळे बारावीच्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

Six class 10 students detained for murder of class 12 student
Six class 10 students detained for murder of class 12 student

Navi Mumbai Murder: इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याची हत्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी दहावीच्या सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांना किशोर न्याय मंडळासमोर हजर केले असता शहरातील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. मयत तरूण दहावीच्या विद्यार्थ्यांमधील वाद सोडवण्यासाठी गेला असता ही धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्भे येथील सामंत कॉलेजजवळील मैदानात बुधवारी दुपारी दहावीच्या मुलांच्या दोन गटात बोर्डाची परीक्षा आटोपून भांडण झाले. एका गटाने दुसऱ्या गटातील मुलाबाबत अश्लील टिप्पणी केली. यानंतर दोन्ही गटात वाद निर्माण झाला, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. मैदानावर उपस्थित असलेल्या मुलांच्या तिसऱ्या गटाने त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारी बारावीची दोन मुले जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी आदित्य भोसले (वय, १७) याला मृत घोषित करण्यात आले. तर, देवांग संदीप ठाकूर (वय, १७) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत आदित्य भोसले आणि जखमी झालेल्या देवांग यांचा भांडणाशी काहीही संबंध नव्हता. मारहाण करणाऱ्या मुलांनी कोणत्याही शस्त्राचा वापर केला नाही, अशी माहिती एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली. आरोपींचा कुणाचीही हत्या करण्याचा हेतू नव्हता आणि भांडणात एका मुलाचा मृत्यू झाल्याचीही त्यांना माहिती नव्हती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलावर नुकतीच अपेंडिसाइटिसशस्त्रक्रिया करण्यात आली असून भांडण सोडवताना त्याला दुखापत झाली. ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला. भांडणात सहभागी मुलांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर