मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune girl rape : बहिणीच्या मित्राने घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार; पुण्यातील कात्रज भागातील धक्कादायक घटना

Pune girl rape : बहिणीच्या मित्राने घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार; पुण्यातील कात्रज भागातील धक्कादायक घटना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 26, 2024 01:09 PM IST

Pune Gril rape : पुण्यात घरात सुद्धा तरुणी सुरक्षित नसल्याची घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीवर तिच्या बहिणीच्या मित्राने घरात घुसून बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.

Rape
Rape

pune girl rape : पुण्यात महिलांवरील अत्याचारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिला घरात सुद्धा सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना रोज उघडकीस येत आहे. अशीच एक घटना कात्रज भगत उघडकीस आली आहे. बहिणीचा मित्र असलेल्या तरुणाने घरात शिरून झोपलेल्या तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना रविवारी घडली असून या प्रकरणी एका तरुणावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune murder : खळबळजनक! पुण्यात पत्नीची दगडाने ठेचून हत्या नंतर मृतदेहाशेजारी पतीची गळफास घेऊन आत्महत्या

विश्वास पारडे (२९, रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घरी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चारच्या सुमारास घडला. तरुणीने रविवारी या प्रकरणी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वास पारडे हा फिर्यादीच्या बहिणीचा मित्र आहे. यामुळे त्याचे फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. गेल्या सोमवारी फिर्यादी तरुणी ही घरात झोपली होती. यावेळी आरोपीने फिर्यादीचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, हा प्रकार फिर्यादीने तिच्या मित्राला सांगितला. याचा राग धरून विश्वास पारडे याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत आहेत.

Manoj Jarange Protest : संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद; संचारबंदीही लागू; एसटी फेऱ्याही राहणार बंद

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार

जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया रमेश ससाणे (वय ३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रमेश बबन ससाणे (वय ४३) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी रमेश ससाणे कामावरुन घरी जेवण करण्यासाठी आले. त्यावेळी जयाने त्यांच्याकडे ५०० रुपये मागितले. पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तिने जेवण वाढताना ताट आणि तांब्या आपटला. त्यामुळे रमेश यांनी तिला चापट मारली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. जयाने रमेश यांचा दंड आणि पाठीवर चाकूने वार केले.

IPL_Entry_Point

विभाग