Delhi Murder : दाजीने चिकन खाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने दाजीला लोखंडी रॉडने मरण करत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतील आनंद विहार भागात ही घटना घडली आहे. चिकन खाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने दाजीला जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पोलिस तपासात आरोपी विकास हा त्याच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत कड़कड़डूमा गावातील घर क्रमांक ३३१ मध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. दोघेही मूळचे बिहारमधील सहरसा येथील रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्री विकासने घरी चिकन बनवले. हे चिकन खाण्यासाठी त्याने दाजी सागरलाही चिकन खाण्यास बोलावले. परंतु सागरने चिकन खाण्यास नकार दिला. मात्र, विकासने सागरला चिकन खाण्याचा हट्ट धरला. यामुळे संतापलेल्या सागरने त्याच्या पत्नीला म्हणजेच विकासच्या बहिणीला फोन करून याबाबत तक्रार केली. फोनवरून बहिणीने भाऊ विकासला खूप सुनावलं. यामुळे विकासला राग आला. या रागाच्या भरात विकासने घरात ठेवलेल्या लोखंडी रॉडने सागरला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत सागर हा गंभीर जखमी झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीचे घरमालक संदीप यांनी पोलिसांना सांगितले की, विकास हा कुटुंबासह गावातील दुसऱ्या घरात राहतो. शुक्रवारी रात्री ९.५० च्या सुमारास ते भाडे घेण्यासाठी आले. यावेळी आरोपी विकास घराबाहेर पळताना दिसला. त्याच्या हातात त्याचे सामान होते. त्याला तो कोठे चालला या बाबत विचारले असता आरोपीने आरडाओरडा करत सागरने त्याला शिवीगाळ केल्याने त्याने त्याची हत्या केली. यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. घरमालक खोलीत गेला तेव्हा सागर रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. तसेच त्याचा मृत्यू झाला होता. या बाबत घरमालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा केला. तसेच आरोपी विकासला काही वेळातच अटक केली.
दिल्लीतील डबरी भागात देखील एका २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या घरातील बेडवर आढळून आला. तिचा पती हा फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फरार पतीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी शुक्रवारी रात्री पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घराचा दरवाजा तोडून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. महिलेची हत्या तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. डीसीपी अंकित सिंह यांनी सांगितले की, दीपा आपला पती धीरजसोबत डबरी भागात राहत होती. पाच वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले होते. दीपा यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. धीरज हा कॅब ड्रायव्हर आहे.