Vanraj Andekar Murder : वनराज आंदेकरच्या हत्येत मोठा ट्विस्ट! बहिणींनी व मेहुण्यांनी केला गेम; आरोपींना अटक-sister her husband plots vanraj andekars murder plan threatened her brother ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vanraj Andekar Murder : वनराज आंदेकरच्या हत्येत मोठा ट्विस्ट! बहिणींनी व मेहुण्यांनी केला गेम; आरोपींना अटक

Vanraj Andekar Murder : वनराज आंदेकरच्या हत्येत मोठा ट्विस्ट! बहिणींनी व मेहुण्यांनी केला गेम; आरोपींना अटक

Sep 02, 2024 02:35 PM IST

Vanraj Andekar Murder : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी १३ जणांनी बंदुका आणि कोयत्याने हल्ला करत खून केला. या प्रकरणी फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. वनराज यांच्या हत्ये मागे बहीण व जावई असल्याचा संशय आहे.

 वनराज आंदेकरच्या हत्येत मोठा ट्विस्ट! बहिणी व मेहुण्यान केला गेम; आरोपींना अटक
वनराज आंदेकरच्या हत्येत मोठा ट्विस्ट! बहिणी व मेहुण्यान केला गेम; आरोपींना अटक

Vanraj Andekar Murder : पुण्यात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हे एका कार्यक्रमानिमित्त नाना पेठेत आले असता तब्बल ६ बाइकवरून आलेल्या १३ ते १५ जणांनी गोळीबार केला. या सोबतच त्यांच्यावर कोयत्याने देखली हल्ला केला. यात वनराज आंदेकरचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी फरार आरोपींना अटक केली आहे. तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली असून बहीण व मेहुण्याने वानराज यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. संजीवनी जयंत कोमकर आणि कल्याणी गणेश कोमकर या बहिणीना  पोलिसांनी अटक केली आहे. 

वनराज आंदेकर हत्ये प्रकरणी आतापर्यंत संजीवनी जयंत कोमकर (रा. ३०९, नाना पेठ), जयंत लक्ष्मण कोमकर, प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड (रा. आंबेगाव पठार, धनकवडी), अनिकेत दूधभाते (रा. आंबेगाव पठार, धनकवडी), तुषार उर्फ आबा कदम (रा. धनकवडी), सागर पवार (रा. धनकवडी), पवन करताल (रा. मंगळवार पेठ) सॅम ऊर्फ समीर काळे यांच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वनराजचे वडील सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर (वय ६८, रा. सोनाई दादा निवास, नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

वनराज आंदेकर रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्या वेळी सहा दुचाकीवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. तर काहींनी कोयत्याने वार केले. वनराज यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

कौटुंबिक वादातून झाली हत्या ?

वनराज यांची हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे पुढे आले आहे. वनराज आंदेकर यांची सख्खी बहिण व मेव्हणा या हल्ल्यामागे असल्याची माहिती पुढे आली आहे. एका भांडणात मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याने व दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याने आलेल्या रागातून बहिणीने वनराजला मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, काल एका टोळक्याने वनराजवर हल्ला करून त्यांची हत्या केली.

वनराज हे सुर्यकांन आंदेकर यांचे चिरंजीव आहे. तर तर, संजीवनी ही वनराजची बहीण आहे, तर, जयंत कोमकर हा जावई आहे. आरोपींचे १ सप्टेंबर रोजी आकाश सुरेश परदेशी याच्याशी भांडण झाले होते. हे भांडण पोलिस ठाण्यात पोहोचले. समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आरोपी गेले असता, शिवम व वनराज आंदेकर हे पोलीस ठाण्यात आले. यावेळी संजीवनी व जयंत यांनी आकाशला मारहाण केली. हे भांडण शिवम आंदेकर यांनी सोडवले. त्यावेळी संजीवनी हिने वनराजला 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' अशी जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

नाना पेठेतील दुकान अतिक्रमण कारवाईत पाडले

गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई असून त्याला नाना पेठेतील एक दुकान देण्यात आले होते. मात्र, हे दुकान महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडले. यावरून आंदेकर व कोमकर कुटुंबामध्ये वाद सुरू झाला. गणेश कोमकरने देखील स्वत:ची गँग तयार केली होती. आंदेकर यांच्या एका नातेवाईकाचा शनिवारी गणेश कोमकर याच्यासोबत वाद झाला होता. त्यात गणेश याला मारहाण करण्यात आली होती. याचा राग गणेशला होता.

विभाग