मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wakad Suicide News : दिलेले पैसे परत मागितल्यानं भावाकडून छळ; कंटाळलेल्या बहिणीनं उचललं टोकाचं पाऊल

Wakad Suicide News : दिलेले पैसे परत मागितल्यानं भावाकडून छळ; कंटाळलेल्या बहिणीनं उचललं टोकाचं पाऊल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 02, 2024 10:31 AM IST

Pimpri Chinchwad Crime News : भावाला दिलेले पैसे परत मागितल्याने भावासह त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने वाकड येथे एका बहिणीने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं.

Pune Crime news
Pune Crime news

Pimpri Chinchwad Crime News : वाकड येथे भाऊ हा बहिणीचा वैरी निघल्याची घटना उघडकीस आली आहे. भावाच्या आणि वाहिनीच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून बहिणीने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली असून वाकड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra weather update : अरबी समुद्रात कमी दाबचा पट्टा! राज्यातील 'या' भागावर पावसाचे सावट; थंडी वाढणार

सुनीता ऊर्फ नीता रामेश्वर राठोड (वय ३१ , रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. याप्रकरणी सुनीता यांचे पती रामेश्वर राठोड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनीता यांचा भाऊ संदीप शामराव चव्हाण आणि त्याच्या पत्नी (दोघे रा. ताथवडे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता आणि रामेश्वर यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. दोघेही मजुरीचे काम करत होते. दरम्यान, सुनीता यांनी त्यांचा भाऊ संदीप याला दोन लाख रुपये उसने दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत संदीपने ते पैसे परत केले नाही. यामुळे सुनीता या ३ डिसेंबरला पैसे परत मागण्यासाठी भावाच्या घरी गेल्या. मात्र, भाऊ संदीप याने पैसे न देता त्याच्या पत्नीने सुनीता यांना शिवीगाळ व मारहाण करून घरातून हाकलून दिले. यानंतर भावाच्या पत्नीने रात्री सुनिता यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांनी या प्रकरणी ४ डिसेंबर रोजी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Petrol-Diesel : ट्रक-टँकर चालकांचा संप, पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची भीती, टाकी फुल्ल करण्यासाठी पेट्रोल पंपावर झुंबड

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सुनीता या एका सोसायटीमध्ये घरकाम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करून घरी परत येत असताना त्यांना भाऊ संदीप आणि त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून सुनीता यांना रस्त्यातच बेदम मारहाण करून जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली.

याबाबत पुन्हा तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, भावाच्या आणि वाहिनीच्या सतत होणाऱ्या छळाला कंटाळून सुनिता यांनी काही दिवसांपूर्वी विषारी औषध पिल्याने सकाळी १० वाजता ताथवडे येथे बेशुद्ध अवस्थेत त्या आढळल्या. काही नागरिकांनी त्यांना रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

WhatsApp channel