सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारची टेम्पोला धडक; एक ठार, २ जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारची टेम्पोला धडक; एक ठार, २ जखमी

सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारची टेम्पोला धडक; एक ठार, २ जखमी

Oct 21, 2024 09:20 AM IST

Sion-Panvel Highway Accident: सायन- पनवेल महामार्गावर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिली.

सायन- पनवेल महामार्गावर भरधाव कारची टेम्पोला धडक
सायन- पनवेल महामार्गावर भरधाव कारची टेम्पोला धडक

Car Collided With Parked Tempo on Sion-Panvel Highway: नवी मुंबईतील जुईनगरजवळ सायन पनवेल महामार्गावर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिली. या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर,दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी टेम्पो चालकावर पार्किंग लाइट न लावता निष्काळजीपणे टेम्पो पार्क केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नरेंद्र राजेंद्र राय (वय, ४५) असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, गौरव विजयशंकर सिन्हा (वय, ४५) आणि अभिनव रामकुमार सिन्हा (वय, ४०) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही कस्टम अधिकारी असून रात्रीच्या शिफ्टवरून घरी जात असताना त्यांच्या कारने जुईनगर स्कायवॉकजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिली.

मयत नरेंद्र राय हे ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते. तर, अभिनव सिन्हा कार चालवत होते. अभिनव सिन्हा यांना किरकोळ दुखापत झाली आणि गौरव सिन्हा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी यांनी दिली.

पुणे- अहमदनगर रोडवरील अपघातांची संख्या चिंताजनक

पुण्यातील अहमदनगर रोडवर गेल्या ९ महिन्यांत जानेवारी ते सप्टेंबर २०२४ या नऊ महिन्यांत ६८ जणांना (६३ पुरुष व ५ महिला) जीव गमवावा लागला आहे.अहमदनगर रोडवर दरवर्षी १०० हून अधिक जणांचा अपघातात मृत्यू होतो. पुणे वाहतूक पोलिसांच्या नोंदीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत या रस्त्यावर १५० हून अधिक अपघातांमध्ये ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक आणि प्रवासी आता नगर रोड ओलांडण्यास घाबरत आहेत.

अहमदनगर रोडवरील विमाननगर चौक ते खांडवे नगर हा भाग विमानतळ पोलिस ठाण्यांतर्गत येतो, तर खांडवे नगर ते पेरणे फाटा हा भाग लोणीकंद पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येतो. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ७९ अपघातांमध्ये यंदा ११ जण ठार झाले. तर, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातांमध्ये ५४ पुरुष व ९ महिलांना आपला जीव गमवावा लागला. ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या या अपघातात नगर रोडवर सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना बंदी असतानाही येथे डंपर वेगाने धावताना दिसतात. गर्दीच्या वेळी वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच बंदीच्या वेळेत धावणारे डंपर आणि अवजड वाहनांवर कडक कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर