Sion Over Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी..! आज मध्यरात्रीपासून सायन ओव्हर ब्रीजवरची सर्व वाहतूक पूर्णपणे बंद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sion Over Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी..! आज मध्यरात्रीपासून सायन ओव्हर ब्रीजवरची सर्व वाहतूक पूर्णपणे बंद

Sion Over Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी..! आज मध्यरात्रीपासून सायन ओव्हर ब्रीजवरची सर्व वाहतूक पूर्णपणे बंद

Updated Jul 31, 2024 10:56 PM IST

Sion Railway Over Bridge: मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होत आहे. या पुलावरून बुधवारी मध्यरात्रीपासून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली जाणार आहे.

सायन ओव्हर ब्रीजवरची सर्व वाहतूक पूर्णपणे बंद
सायन ओव्हर ब्रीजवरची सर्व वाहतूक पूर्णपणे बंद

Sion Railway Bridge : आज (बुधवार) मध्यरात्री १२ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होत आहे. या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली जाणार आहे. ११२ वर्षे जुना हा ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पाडण्यात येणार असून जागी नवीन पूल बांधला जाणार आहे. ३१ जुलै २०२६ पर्यंत नवीन पुलाची निर्मिती पूर्ण होणार आहे. दरम्यान सायन उड्डाणपूल बंद (Sion Railway Over Bridge closed) झाल्यानंतर, मुंबईतील रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून प्रवाशांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे.

मध्य रेल्वे,  मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने  १२/१०-११ किमी अंतरावरील शीव रेल्वे स्थानकाजवळ सध्याच्या आरओबीच्या जागी नवीन  पूल बांधला जाणार आहे.  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबईने त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये आरओबी हटवण्याची आणि स्टील गर्डर्स आणि आरसीसी स्लॅबसह नवीन आरओबी पुन्हा बांधण्याची शिफारस केली होती. त्यानंतर नवीन पूल बांधला जाणार आहे. 

१ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत २ वर्षे सायन पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. यामुळे माटुंगा वाहतूक विभागातून बि.ए. रोडवरून सायन ओव्हर ब्रिज (प) वाहिनीमार्गे एल.बि.एस रोड, संत रोहिदास रोडकडे जाणारी वाहतूक, कुर्ला वाहतूक विभागातून एल. बी. एस. रोड मार्गे जाणारी वाहतूक ही तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. संत रोहिदास रोडवरून सायन ओव्हर ब्रिज पूर्व वाहिनीवरून बी.ए. रोड मार्गे जाणारी वाहतूक ही तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. या मार्गांवरील वाहतूक इतर मार्गाने वळवून पुढीलप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रेल्वे व महापालिकेचा खर्च किती ?

नवीन पूल निर्मितीमध्ये मध्य रेल्वे २३ कोटी तर  मुंबई महापालिका २६ कोटी रुपये खर्च करणार आहे. पूल पाडल्यानंतर मुंबईला पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत. दोन्ही बाजूकडील वाहनांना मोठा वळसा घालून मार्गक्रमण करावे लागेल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर