
वसई : मुंबईच्या वसईमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका लॉजमध्ये थांबलेलेल्या गायकावर लॉजमध्ये थांबलेलेल्या दुसऱ्या ड्रायव्हरने चाकूने छातीवर त्याची हत्या केली. चप्पल आणि बॅग ठेवण्याच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली.
राधाकृष्ण व्यंकटरमन ( वय ५८) असे खून झालेल्या गायकाचे नाव आहे. तर राजेश शहा (वय ५४) असे खून करणाऱ्या आरोपी ड्रायव्हरचे नाव आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत राधाकृष्ण व्यंकटरमन हे गायक आहेत. तर आरोपी शहा हा ड्रायव्हर आहे. हे दोघेही वसई रोड पश्चिम परिसरातील एका लॉज मध्ये राहत होते. आरोपी गेल्या चार वर्षांपासून याच लॉज मध्ये राहायला आहे.
रविवारी दुपारी दोघेही लॉजमध्ये असतांना त्यांच्यामध्ये चप्पल आणि बॅग ठेवण्याच्या मुद्यावरून जोरदार वाद सुरू झाले. हा वाद टोकाला गेल्याने आरोपी शहा याने चाकूने व्यंकटरमण यांच्या छातीवर वार केले. यातील एक वार वर्मी बसून चाकू थेट छातीत जाऊन रूतला. ही घटना लॉज व्यवस्थापकाला कळली.
त्याने तातडीने घटनास्थळी येतून जखमी गायक व्यंकटरमण यांना दवाखान्यात नेले. मात्र, उपचारा दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील करत आहेत.
संबंधित बातम्या
