
Pune Crime News : पुण्यात येरवडा येथे एका नामांकित आयटी कंपनीत शुभदा कोदारे हिच्यावर कोयत्याने वार करून तिची हत्या केली होती. आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा याने आर्थिक वादातून तिची हत्या केल्याचं आता उघड झालं आहे. शुभदाने वडिलांच्या आजारचे कारण देत कृष्णाकडून तब्बल ४ लाख रुपये घेतले होते. मात्र, प्रत्यक्षात तिने खोटे बोलून हे पैसे घेतले होते. ही बाब कृष्णाला कळल्यावर रागाच्या भरात त्याने कंपनीच्या आवारातच तिच्यावर मोठ्या सूऱ्याने वार करत तिची हत्या केली. कंपनीच्या आवारात ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली होती. आता या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून कंपनीच्या आवारात घडलेल्या थरार या व्हिडिओत कैद झाला आहे.
शुभडा ही विमाननगर येथील एका आयटी कंपनीत काम करत होती. तर आरोपी देखील याच कंपनीत काम करत होता. दोघांची २०२२ मधे भेट झाली होती. या आयटी कंपनीत कृष्णा हा लिपिक होता तर शुभदा ही एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. दोघांची मैत्री झाली. दरम्यान, कृष्णाचा विश्वास संपादन केल्यावर शुभदाने वडील आजारी असल्याचे खोटं कारण सांगत त्यांच्या उपचारांसाठी कृष्णाला पैसे मागितले. त्याने तब्बल चार लाख रुपये शुभदाला दिले. मात्र, तिने आणखी पैशांची मागणी केल्यामुळे कृष्णाने अडीच महिन्यांपूर्वी थेट कराडमध्ये शुभदाच्या घरी जाऊन तिच्या वडिलांची भेट घेतली. यावेळी त्याने तिच्या वडिलांना शुभदाने त्यांच्या उपचारांसाठी त्याच्याकडूंन ४ लाख रुपये घेतल्याचे सांगितले. मात्र, शुभदाच्या वडिलांनी त्यांना कोणताही आजार नसल्याचं सांगितलं. यामुळे त्याला मोठा धक्का बसला. शुभदाचे खोटे बोलणे त्याच्या जिव्हारी लागले. यातून त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला.
शुभदाच्या खोटे बोलण्याने कृष्णाला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे याचा जाब कृष्णाला शुभदाला विचारायचा होता. शुभदा ही कधी कामावर येते हे कृष्णाला माहिती होते. शुभदाने मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता कामावर आली. अर्धा तास ती लवकर आल्याने ती पार्किंगमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये थांबली. यावेळी कृष्णाने तिला पाहिले. त्याने तिच्याकडे पाहून स्मित हास्य केले. दरम्यान, दोघे जवळ आल्याने कृष्णाने शुभदाला तू माझ्या पैशाचं काय करतेस असा प्रश्न विचारला. यववरून दोघांमध्ये वाद झाला. शुभदा काही सांगणार त्या आताच त्याने तिच्यावर कोयत्याने करत शुभदा हिच्या उजव्या हातावर, कोपरावर चार ते पाच वार केले. यात शुभदा ही गंभीर जखमी झाली.
या घटनेत शुभदा ही गंभीर जखमी झाली. ती पार्किंगच्या आवारातच पडून होती. यावेळी कंपनीच्या आवारातील अनेक जण तिला पाहत होते. तर कृष्णा हा हातात मोठा चाकू घेऊन तिच्या आजूबाजूला फिरत होत. यावेळी नागरिक कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याच्या हातात चाकू सल्याने कुणी त्याच्यावर जाण्यास धजावत नव्हते. थोड्या वेळाने कृष्णाने शुभदाजवळ जाऊन तिला धक्का दिला. यामुळे जखमी सहूबाधा ही खाली पडली. तर कृष्णाने देखील तिच्या बाजूला येत हातातील चाकू फेकून दिला. यानंतर जमावाने कृष्णाला पकडून चोप दिला. व आरोपीला पोलिसांच्या हवाली केले. तर शुभदाला दवाखान्यात भरती केले. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने शुभदाचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या
