केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात राज्यतातील मालवाहतूक करणाऱ्या ट्रक-टँकर चालकांनी संप सुरू केला आहे. यामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होऊन इंधन मिळणार नाही, या भीतीने राज्यभरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी एकच गर्दी केली आहे. ट्रक चालकांच्या आंदोलनाचा सोमवारी सायंकाळपासून परिणाम दिसू लागला आहे असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात सुरू असलेला मालवाहतूकदारांचा संप बुधवार (३ जानेवारी) पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलचा तुटवडा भासू लागल्याचेही चित्र आहे. तर दोन दिवस पेट्रोल डिझेल मिळणार नाही. भीतीने पेट्रोल पंपाबाहेर टाकी फूल्ल करण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान संप लांबल्यास अन्य वाहनांबरोबरच इंधन अभावी एसटी महामंडळाच्या वाहतुकीवरही परिणाम होण्याची भीती आहे.
दुचाकी-चारचाकी वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर केलेल्या गर्दीमुळे अर्धा ते एक तास रांगेत उभे रहावे लागत असल्याचे चित्र आहे. मात्र पेट्रोलसाठी लोक तासभऱ लाईनमध्ये थांबत आहेत. दरम्यान मनमाडमधून इंधन वाहतूक ठप्प असल्याने नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये संपाचा परिणाम उद्या (मंगळवार) दिसून येण्याची शक्यता आहे.
दरम्यान पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप सुरळीत चालू राहणार असल्याची माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनने दिली आहे.
संबंधित बातम्या