मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तरुणांचा B.Ed ला अल्प प्रतिसाद.. पहिल्या फेरीत केवळ ७ हजार ७२७ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

तरुणांचा B.Ed ला अल्प प्रतिसाद.. पहिल्या फेरीत केवळ ७ हजार ७२७ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 05, 2022 10:37 PM IST

B. Ed Admissions : राज्यातील तरुणांचा शिक्षक होण्याकडे कल कमी झाल्याचे दिसून येत आहेत. राज्यातील ४८० महाविद्यालयांमध्ये ३५ हजार ३५९ रिक्त जागा असताना पहिल्या फेरीत केवळ ७ हजार ७२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) राबवण्यात येणाऱ्या शिक्षणशास्त्र (बी.एड.) प्रवेश प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. एकेकाळी शिक्षण होण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांची या कोर्सबाबत उदासीनता पाहायला मिळत आहे. बी.एड. प्रवेशाच्या पहिल्या  फेरीत   केवळ ७ हजार ७२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, दुसऱ्या फेरीची निवड यादी १२ डिसेंबरला जाहीर होणार आहे.

सीईटी सेलकडून राज्यात शिक्षणशास्त्र विभागासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील ४८० महाविद्यालयांचा सहभाग आहे. प्रवेशासाठी एकूण ३५ हजार ३५९ जागा उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेत ५७ हजार ९४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाविद्यालयांचे पर्याय भरलेल्या ३० हजार १६७ विद्यार्थ्यांपैकी सात हजार ७२७ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे बीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येते. प्र

वेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीची निवड यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. या फेरीनंतर संस्थास्तरावर प्रवेश फेरी राबविण्यात येणार असल्याने, डिसेंबर अखेरपर्यत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांचा कमी ओढा लक्षात घेता यंदा बऱ्यात जागा रिक्त राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग