मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal Shocking: यवतमाळमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला शेतातील विहिरीत ढकलले, पतीला अटक
Jail
Jail

Yavatmal Shocking: यवतमाळमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला शेतातील विहिरीत ढकलले, पतीला अटक

06 March 2023, 10:27 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Yavatmal Crime: यवतमाळमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत.

Yavatmal Horror: यवतमाळच्या कळंब तालुक्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला विहिरीत ढकलून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (३ मार्च २०२३) सांयकाळी उघडकीस आली. सुरुवातीला आरोपीने ही हत्या नसून अपघात असल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना आरोपीवर संशय आल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने पत्नीच्या हत्येची कबूली दिली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशी सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राहुल मेश्राम (वय, ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी राहुल हा शेतकरी असून त्याचे अमरावती येथील पूजा मेश्राम (वय, २६) हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. मात्र, राहुल हा पूजाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. या कारणांवरून दोघांत सतत वाद होत असे. दरम्यान,२ मार्चला राहुल पूजाला कामाचे कारण सांगत शेतात घेऊन गेला. शेतात गेल्यानंतर त्याने पूजाला विहिरीतून पाणी काढायला सांगितले. त्यावेळीच राहुलने पूजाला विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर काही घडलेच नाही, असे दाखवत तो घरी परत आला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी विहिरीत पूजाचा मृतदेह आढळून आला.

पूजेच्या मृत्यूनंतर तिचे वडिल महादेव गजबिये यांनी आरोपी राहुल विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी राहुलची कसून चौकशी केली असता त्यानेच पत्नीला विहिरीत ढकलून दिल्याची कबूली दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.