Pune Crime : कॅन्टीन कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला व रुममेटच्या त्रासाला कंटाळून अभियांत्रिकी तरुणीची पेटवून घेत आमहत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : कॅन्टीन कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला व रुममेटच्या त्रासाला कंटाळून अभियांत्रिकी तरुणीची पेटवून घेत आमहत्या

Pune Crime : कॅन्टीन कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला व रुममेटच्या त्रासाला कंटाळून अभियांत्रिकी तरुणीची पेटवून घेत आमहत्या

Mar 20, 2024 04:19 PM IST

Pune Bharti vidyapith crime : रेणुका बालाजी साळुंके हिने पेटवून घेत आत्महत्या केली आहे. ती भारती विद्यापीठ येथील इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होती.

रेणुका बालाजी साळुंके हिने पेटवून घेत आत्महत्या केली आहे. ती भारती विद्यापीठ येथील इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होती.
रेणुका बालाजी साळुंके हिने पेटवून घेत आत्महत्या केली आहे. ती भारती विद्यापीठ येथील इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होती.

Pune Bharti vidyapith crime : पुण्यात गुन्हेगारीने (Pune Crime news) कळस गाठला असतानाच आता धक्कादायक बातमी समोर आली आहे. होस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांच्या (College Canteen) छेडछाडीला कंटाळून आणि रूममेटच्या ( HotelRoomate)त्रासाला कंटाळून तरुणीचे स्वत:ला पेटवून घेतले आहे. पुण्यातील नामांकित इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ही घटना घडली आहे. यात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सात मार्चला ही घटना घडली असून या घटनेविरोधात भारती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पॅम कॉलने त्रस्त आहात तर आता चिंता नाही! truecaller ने आणलं भन्नाट फीचर; आपोआप ब्लॉक होणार नको असलेले कॉल

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका बालाजी साळुंके (वय १९) असे पेटवून घेतलेल्या मुलीचं नाव आहे. ती भारती विद्यापीठ येथील इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. तिला होस्टेलच्या कॅन्टीन मधील कर्मचारी असलेला सतीश जाधव सतत आय लव्ह यूचा मेसेज करत होता. तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले, असे तो सारखा येता-जाता बोलत होता. हे सगळं पाहून रेणूकाच्या मनात भीती निर्माण झाली. त्यानंतर तिने हा प्रकार कोणाला सांगायचा प्रयत्न केला मात्र तिला ते जमलं नाही. त्यासोबतच हॉस्टेलमध्येच राहणारी मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू (वय १९ ) ही देखील तिला त्रास देत होती. रेणूकाला अभ्यासात त्रास देत होती.

त्रासाला कंटाळली अन् थेट...

हा सगळा प्रकार रेणूकाच्या डोक्यात गेला आणि तिने थेट स्वत: ला संपवण्याचा प्रयत्न केला. ती बाथरुमध्ये गेली आणि तिने थेट स्वत:ला पेटवून घेतलं. तिला तातडीने पुण्यातील सुर्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि तिची रुममेट असलेली मुस्कानवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Zomato green : झोमॅटो बॉयच्या हिरव्या रंगाच्या पोषाखावरून मोठा वाद; कंपनीनं काही तासांतच निर्णय बदलला!

कात्रज तलावात उडी मारून लॉं कॉलेजच्या तरुणीची आत्महत्या 

कात्रज तलावात तरुणीने उडी मारून एका लॉं कॉलेजच्या तरुणीने आत्महत्या केली. अग्निशमन दलाकडून शोधमोहीम राबवून तलावात बुडलेल्या तरुणीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढलासापडला असून, तिची ओळख अद्याप पटलेली नाही. या तरुणीचे वय अंदाजे २३ वर्षे आहे.  याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. शनिवारी मध्यरात्री एका तरुणीने कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात उडी मारल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर