मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik: नाशकात नोकरीच्या शोधात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अडीच महिन्यानंतर गुपीत उघड

Nashik: नाशकात नोकरीच्या शोधात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अडीच महिन्यानंतर गुपीत उघड

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 25, 2023 08:52 PM IST

Nashik Rape: नाशिकमध्ये नोकरीच्या शोधात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

Nashik Rape
Nashik Rape (HT_PRINT)

Nashik Crime: महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यात नाशिक शहरातील घटनेने आणखी भर घातली आहे. नोकरी शोधायला गेलेल्या अल्पवयीन मुलीला ज्यूसमधून गुंगीचे देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तब्बल अडीच महिन्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये १ मार्च २०२३ रोजी उन्हाळी कामाच्या शोधात गेली होती. त्यावेळी तिला टिळकवाडी सिग्नल परिसरात योगा वेलनेस स्पा येथे कामासाठी मुली पाहिजे असल्याचा फलक दिसला. तिथे गेल्यानंतर संशयित आरोपी असलेल्या महिलेने तिला साफसफाईचे काम असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडिता २ मार्च रोजी कामासाठी गेली असता या महिलेने पीडिताला ज्यूस प्यायला दिले. त्यामध्ये गुंगीचे औषध असल्याने पीडिता थोड्यावेळाने बेशुद्‌ध झाली.

पीडिता शुद्धीवर आली असता ती एका खोलीत नग्न अवस्थेत होती. त्यावेळी संबंधित महिलेने पडिताला तिचा अश्लील व्हिडिओ दाखवला. तसेच मी सांगेन तसे न केल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला एका अज्ञात व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली.

बदनामीच्या भितीने पीडिताने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. अखेरिस गेल्या १७ मे २०२३ रोजी पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईच्या कानावर घातला. त्यानंतर पीडिताच्या आईने तिला घेऊन त्वरीत सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग