मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime भयंकर! पुण्यात नाना पेठेत तरुणावर ३५ वार करून खून; घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Crime भयंकर! पुण्यात नाना पेठेत तरुणावर ३५ वार करून खून; घटना सीसीटीव्हीत कैद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jul 27, 2022 11:18 PM IST

पुण्यात नाना पेठेत एका तरुणाचा सोमवारी मध्यरात्री खून करण्यात आला. त्याच्यावर जवळपास ३५ वार करण्यात आले. या सोबतच डोक्यात सीमेन्टचा ब्लॉक घालण्यात आला.

पुणे न्यूज
पुणे न्यूज

पुणे : पुण्यात बुधवारी एका तरुणावर तब्बल ३५ वेळा चाकूने वर करून तसेच सीमेन्टचा ब्लॉक डोक्यात घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. खुनाचा संपूर्ण थरार हा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

अक्षय वल्लाळ (वय ३३ ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी महेश नारायण बुरा आणि किशोर अशोक शिंदे या दोघांना अटक करण्यात आली आहे. घोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. या प्रकरणी अतुल गंगाधर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अक्षय हा सामाजिक कार्यात अग्रेसर होता. प्रत्येकाच्या मदतीला तो धावून जायचा. काही दिवसांपूर्वी आरोपीचे त्याच्याशी वाद झाला होता. यामुळे ते दोघेही अक्षयला मारण्याच्या प्रयत्नात होते.

सोमवारी मध्यरात्री अक्षय हा त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. यावेळी आरोपी त्या ठिकाणी आली आले आणि अक्षयवर अचानक वर करण्यास सुरुवात केली. काही क्षणात आरोपींनी अक्षयवर ३० तड ३५ वार केले. यामुळे त्याच्या जागेवरच मृत्यू झाला. यानंतरही आरोपी अक्षयला मारतच होते. त्यांनी रस्त्यावरील सीमेन्टचा ब्लॉक घेत त्याच्या डोक्यात मारला. या नंतर दोघे फरार झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

WhatsApp channel