Mowad Mass suicide : नागपूर हादरले! निवृत्त शिक्षकाने गळफास घेत संपूर्ण कुटुंबासह केली सामूहिक आत्महत्या-shocking incident happened in nagpurs mowad the teacher ended his life with his entire family ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mowad Mass suicide : नागपूर हादरले! निवृत्त शिक्षकाने गळफास घेत संपूर्ण कुटुंबासह केली सामूहिक आत्महत्या

Mowad Mass suicide : नागपूर हादरले! निवृत्त शिक्षकाने गळफास घेत संपूर्ण कुटुंबासह केली सामूहिक आत्महत्या

Oct 02, 2024 02:17 PM IST

Nagpur Mowad Mass suicide : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोवाड येथे खळबळजनक घटना घडली आहे. सेवानिवृत्त शिक्षकाच्या कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

 नागपूर हादरले! गळफास घेत शिक्षकाने संपूर्ण कुटुंबासह आयुष्य संपवलं
नागपूर हादरले! गळफास घेत शिक्षकाने संपूर्ण कुटुंबासह आयुष्य संपवलं

Nagpur Mowad Mass suicide : उपराजधानी नागपूर येथील नरखेड तालुक्यातील मोवाड येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील सेवानिवृत्त शिक्षकाने कुटुंबातील चौघांसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदनासाठी ते दवाखान्यात पाठवण्यात आले आहेत. या सर्वांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, तीन मृत व्यक्तींचे हात पाय बांधलेले आढळले असल्याने घातपात झाल्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विजय पचोरी असे सेवानिवृत शिक्षकाचे नाव आहे. तर पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी असे इतर मृतकांची नावे आहेत. या सर्वांनी गळफास घेतला. तिघांचे हात पाय बांधले असल्याने पित्याने त्यांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे.

काय आहे घटना ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय पचोरी हे सेवानिवृत शिक्षक आहेत. ते त्यांच्या मुलांसह मोवाड येथे राहत होते. गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या व्यवसायातील झालेल्या तोट्यामुळे त्यांच्यात वाद होते. दरम्यान, हा वाद विकोपाला गेल्यामुळे त्यातून त्यांनी तिघांची हत्या करून त्यांना लटकावून त्यांचे हात पाठीमागे बांधून त्यांना लटकवले यानंतर त्यांनी स्वत: आत्महत्या केली तर केली असावी अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू करण्यात आल्या असून तपास झाल्यावर या घटनेचा उलगडा होईल असे पोलिसांनी सांगितले.

 

Whats_app_banner
विभाग