मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati crime : अमरावती हादरले! १०० रुपयांच्या दारूसाठी नराधम मुलानं केला जन्मदात्या आईचा खून

Amravati crime : अमरावती हादरले! १०० रुपयांच्या दारूसाठी नराधम मुलानं केला जन्मदात्या आईचा खून

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 03, 2024 10:22 AM IST

Amravati Crime News : दारूच्या व्यसनामुळे (amravati news) एका मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात भोकरबर्डी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अमरावती जिल्ह्यात १०० रुपयांच्या दारूसाठी नराधम मुलानं केला जन्मदात्या आईचा खून
अमरावती जिल्ह्यात १०० रुपयांच्या दारूसाठी नराधम मुलानं केला जन्मदात्या आईचा खून

Amravati Crime News : दारूच्या आहारी गेलेल्या एका मुलाने आईने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिचा खून केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

पवन जांबेकर असे आरोपी मुलाचे नाव आहे. तर गंगाबाई मोतीलाल जांबेकर असे खून करण्यात आलेल्या वयोवृद्ध मृत आईचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पवनवर गुन्हा दाखल केला आहे.

BJP Candidates List 2024 : भाजपच्या पहिल्या यादीतून दिग्गज मंत्र्यांना डच्चू, पाहा संपूर्ण यादी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाबाई या शेती करतात तर आरोपी हा बेरोजगार असून त्याला दारूचे व्यसन आहे. दारू पिण्यासाठी सतत पैशांचा तगदा पवन हा आई गंगुबाई यांच्याकडे लावत होता. यातून त्यांचे भांडणे देखील होत होते. मेळघाटातील भोकरबर्डी येथील रहिवासी असलेल्या गंगाबाई मोतीलाल जांबेकर यांच्या बँकेच्या खात्यात पी एम किसान सन्मान योजनेचे पैसे जमा झाले होते. ही बाब मुलगा पवन जांबेकरला कळाली.

Thane crime news : खळबळजनक! पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे शोषण, ठाण्यात मांत्रिकासह ७ जणांच्या टोळीला अटक

पवनने दारू पिण्यासाठी गंगूबाई यांच्या कडे पैशांचा तगादा लावला होता. १०० रुपये दारू पिण्यासाठी दे अशी मागणी तो करत होता. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने गंगूबाई हा त्याला पैसे देत नव्हत्या. त्याला अनेकवेळा समजावून सांगूनही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बँकेत पैसे असून देखील आई पैसे देत नसल्याच्या रागातून पवनने शनिवारी गंगूबाई यांच्याशी वाद घातला. गंगूबाई यांनी त्याला विरोध केल्याने पवनचा राग अणावर झाला. रागाच्या भरात त्याने वृद्ध आईला काठीने बेदम मारहाण केली. यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्याने अवघ्या शंभर रुपयांसाठी आईला मारहाण करून तिची हत्या केली. गंगूबाई गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या हत्येच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी या बाबत माहिती पोलिसांना दिली असता, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रकरणाची कायदेशीर कारवाई करत चौकशी केली असता मारेकरी पवनने आपल्या कृत्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

IPL_Entry_Point