Baramati Crime : धक्कादायक! बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत फोटो काढले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Baramati Crime : धक्कादायक! बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत फोटो काढले

Baramati Crime : धक्कादायक! बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत फोटो काढले

May 13, 2024 07:08 AM IST

Baramati Crime : बारामती येथे वीज बिल कमी करणाऱ्यावरून एका महावितरण कर्मचारी महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका जोडप्याला लुटून त्यांना नग्न करण्यात आले.

बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत फोटो काढले
बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत फोटो काढले

Baramati Crime : बारामती येथे वीज बिल कमी करणाऱ्यावरून एका महावितरण कर्मचारी महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुचाकीवर बसून गप्पा मारत बसलेल्या एका जोडप्याला दोघांनी लुटले. ऐवढेच नाही तर त्यांना अंगावरील कपडे काढण्यास सांगून त्यांचे नको त्या अवस्थेतील फोटो देखील त्यांनी काढले. ही घटना शुक्रवारी रात्री ७ ते ८ च्या सुमारास गोजबावी हद्दीत बारामती विमानतळाजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पिडीत तरुण तरुणी हे दोघेही बारामती येथे शिक्षण घेत आहे. हे दोघेही फिरायला गेले असता असा हा गंभीर प्रकार घडला.

Lok sabha Election 4 phase voting live : महाराष्ट्रात ११ तर देशात आज ९६ जागांवर होणार मतदान; आयोगाची तयारी पूर्ण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुण आणि तरुणी हे दोघे बारामती येथे शिक्षण घेतात. यातील तरुणी ही १२ मध्ये शिक्षण घेते. हे दोघेही शुक्रवारी गोजीबुवा मंदिर परिसरात असलेल्या विमानतळ येथे दोघे फिरण्यासाठी गेले होते. ते एका ठिकाणी गाडी बसून गप्पा मारत होते. यावेळी दोन आरोपी त्यांच्याजवळ आहे. त्यांनी चाकूचा धाक दाखवून दोघांना गाडीच्या बाहेर काढले. यानंतर मुलीला तिच्या गळ्यातील सोनसाखळी व कानातील दागिने हिसकावले. सुमारे नव्वद हजारांचा ऐवज त्यांनी काढून घेतला. तर दुसऱ्या आरोपीने तिच्या मित्राला दगडाने मारहाण केली.

कपडे काढण्यास भाग पाडून नग्न अवस्थेत काढले फोटो

आरोपींनी दोघांनाही जवळच असलेल्या एका खड्ड्यात नेऊन त्यांना अंगावरील कपडे जबरदस्तीने काढायला लावले. यानंतर दोघांची नग्न अवस्थेतील फोटो त्यांनी काढले. तसेच हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर आरोपी हे फरार झाले. या घटनेतून सावरत तरुण आणि तरुणीने बारामती पोलिस ठाणे गाठले. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. हे आरोपी कोण आहेत, याचा शोध लागला नाही.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर